हाँगकाँग : दक्षिण हिंदी महासागरात शनिवारी ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
अमेरिकेच्या भौगोलिक सर्व्हेक्षण संस्थेनुसार, मॅकडोनल्ड बेट आणि हर्ड बेटापासून १०२० किलोमीटर अंतरावर सहा वाजून २४ मिनिटांनी (आंतरराष्ट्रीय वेळेनुसार सोमवारी रात्री १० वाजून २४ मिनिटांनी ) भूकंपाचा धक्का बसला.
हिंदी महासारगातील आग्नेय दिशेला या भूकंपाचे केंद्रस्थान असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या भूकंपामुळे त्सुनामीची शक्यता नसल्याची माहिती संस्थेने दिलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.