इस्लामाबाद: मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर रहमान लखवी याला पाकिस्तान सरकारनं पुन्हा ताब्यात घेतल्यामुळं लख्वीचा तुरूंगवास अटळ आहे. लखवी याला सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली स्थानबद्ध करण्याचा पाकिस्तान सरकारचा आदेश हाय कोर्टानं काल निलंबित केला होता, त्यानंतर त्याची सुटका होणार होती.
मात्र याप्रकरणी भारतानं आपली नाराजी तीव्र शब्दांत व्यक्त केल्यानंतर लखवीला पुन्हा ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्या वकिलांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
२६/११च्या खटल्यात लखवीला जामीन मिळाल्यानंतर चौफेर टीका होऊ लागल्यानं सरकारनं त्यास सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली स्थानबद्ध केलं होतं. त्यामुळं जामीन मिळूनही लखवी तुरुंगातून सुटू शकला नव्हता. मात्र, कोर्टानं स्थानबद्धतेचे हे आदेशच निलंबित करून लखवीच्या सुटकेच्या मार्गातील अडसर हटवला होता.
मात्र पाकिस्तान सरकारनं आता त्याला दुसऱ्या प्रकरणात ताब्यात घेटलं असून आता त्याची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.