पाटणा : बिहारच्या सीधी जिल्ह्यातील चुरहट या छोट्या गावात खळबळ माजविणारी घटना घडली. एका वहिनीने आपल्या दिराचे लिंग कापले.
दिर आपल्या वहिनीशी अवैध संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत होता. तीने नकार दिल्यावर त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.
वहिनीला राग आला तिने दिराला रक्त बंबाळ केले. या हातापाईमध्ये वहिनीने दिराचे लिंग कापले. त्यानंतर ती थेट पोलिस ठाण्यात गेली.
अस्ताव्यस्त हालतमध्ये या स्त्रीला चुरहट येथील पोलिसांनी पाहिल्यावर त्यांच्या अंगावर काटा आला. पोलिसांनी तिला विचारल्यावर ती म्हटली 'काट डाला'
यानंतर दिराने घऱाच्या बाहेर असलेल्या झाडाला लटकून आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाला पाठवले आहे. महिला पोलिसांच्या ताब्यात आहे.