स्नॅपडील महिला कर्मचाऱ्यासाठी त्याची एकतर्फी 'दिल की डील'

दीप्तीच्या अपहरणाचं सत्य आता बाहेर येण्यास सुरूवात..

Updated: Feb 15, 2016, 05:14 PM IST
स्नॅपडील महिला कर्मचाऱ्यासाठी त्याची एकतर्फी 'दिल की डील' title=

गाझियाबाद : स्नॅपडीलची दिल्लीतील कर्मचारी दीप्ती सरनाच्या अपहरणामागील सत्य आता बाहेर येण्यास सुरूवात झाली आहे. या अपहरणाची कहाणी रंजक आहे, एकतर्फी प्रेम असलं तरी आरोपीने स्नॅपडीलच्या टॅगलाईन प्रेमाने 'दिल की डील' करण्याचा प्रयत्न केला होता. दीप्तीच्या अपहरण प्रकरणी ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पठ्ठ्याने १५० वेळा पाठला केला, पण ....

गाझियाबादचे एसएसपी धमेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अपहरणाआधी आरोपीने १५० वेळेस दीप्ती सरनाचा पाठलाग केला. या युवतीने या आरोपींमधील कुणालाही या आधी पाहिलेलं नव्हतं.

एकतर्फी 'दिल की डील'

कट रचणारा आरोपी देवेंद्र सोनीपत हा कामी गावचा रहिवासी आहे. तो युवतीशी एकतर्फी प्रेम करत होता, तिला मिळवण्यासाठी त्याने हा कट रचला. आरोपींचा उद्देश अजून स्पष्ट झालेला नाही. 

कारण या संपूर्ण घटना क्रमात आरोपींनी खंडणी मागितली नाही, किंवा दीप्ती सरनाला शारीरीक दुखापतही केली नाही, या दरम्यान युवतीला त्यांनी जेवण दिलं, तसेच आरोपी देवेंद्र सोनीपतने तिला विश्वास दिला की आम्ही तुला काहीही होऊ देणार नाहीत. मात्र या दरम्यान तिला खूप पायी फिरवल्याने, तिचे पाय सुजले आहेत.

दीप्तीला मेट्रो स्टेशनवर पाहिलं आणि...

आरोपीने एक वर्षाआधी जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान राजीव चौक मेट्रो स्टेशनवर पहिल्यांदा पाहिलं होतं. तेव्हापासून दीप्ती आपल्याला आवडायला लागल्याचं त्याने सांगितलं, दीप्तीच्या ऑफिसमधील एका युवकाकडून तो काही माहिती घेत होता, त्याचं नाव अजून समोर आलेलं नाही. दीप्तीबद्दल त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात माहिती होती. या दरम्यान तो अनेक वेळेस तिच्या घरापर्यंत जाऊन पोहोचला.

दीप्तीशी कधीच संभाषण करण्याचा कधीच...

दीप्तीचा १५० वेळा पाठलाग केल्यानंतर आरोपीने दीप्तीशी कधीच संभाषण केलं नाही, तसेच आपल्या साथीदारांसोबत या प्रकरणाची कोणतीही माहिती दिली नाही. उलट त्याने आरोपींना दीप्ती हवालासाठी काम करते असं सांगून कटात सामील केलं होतं, तिला पकडलं तर ती हवालाबद्दल पोलिसांनाही सांगणार नाही, असं त्याने म्हटलं होतं.

अपहरणादरम्यान तो आपल्या साथीदारांबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया उभी करत होता, आणि स्वत:ला हिरो दाखवण्याचा प्रयत्न करत होता.

अपहरणातून मुक्त करताना, मित्र बनवून जातेय की, शत्रू...

दीप्तीचं अपहरण केल्यानंतर पोलिसांनी दीप्तीचा जोरदार शोध सुरू केला, आरोपीला अनेक तासानंतर पोलीस जंगजंग पछाडत असल्याचं भान आलं, यावेळी त्याला सुबुद्धी सुचली, त्याने दीप्तीला परत पाठवण्याचा योग्य निर्णय घेतला. 

तो अखेर दीप्तीला स्टेशनला सोडायला आला आणि म्हणाला, "मित्र बनवून जातेय की शत्रू...", आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, दीप्तीने पोलिसांना चौकशीत उत्तर देताना, आरोपीविषयी कोणतीही कठोर भूमिका घेतली नाही.