मोदी आणि योगींवर रामगोपाल यांचं पुन्हा वादग्रस्त ट्विट

सिनेदिग्दर्शक आणि निर्माते रामगोपाल वर्मा आपल्या विधानांमुळे नेहमी वादात अडकता. यावेळेस त्यांनी पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल ट्विट केलं आहे. रामगोपाल वर्मा यांनी पंतप्रधान मोदींची तुलना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत केली आहे.

Updated: Mar 26, 2017, 01:30 PM IST
मोदी आणि योगींवर रामगोपाल यांचं पुन्हा वादग्रस्त ट्विट title=

नवी दिल्ली : सिनेदिग्दर्शक आणि निर्माते रामगोपाल वर्मा आपल्या विधानांमुळे नेहमी वादात अडकता. यावेळेस त्यांनी पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल ट्विट केलं आहे. रामगोपाल वर्मा यांनी पंतप्रधान मोदींची तुलना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत केली आहे.

रामगोपाल वर्माने ट्विटर ट्विट केलं आहे की, 'योगी खूप चांगले आहेत. मला वाटतं ते नरेंद्र मोदींपेक्षा ही चांगले आहेत. मला आशा आहे की ते देशाचे पुढचे पंतप्रधान होतील.'

रामगोपाल वर्मा यांनी एक दुसरं ट्विट करत म्हटलं आहे की, 'अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप काही मिळवू शकले किंवा नसले तरी मीडिया हे निश्तिच करेल की, ट्रंप अमेरिकेच्या राजकीय इतिहासात एक मोठा जोक म्हणून आठवणीत राहतील.'