पप्पू कलानीची जन्मठेप कायम - सुप्रीम कोर्ट

उल्हासनगरचा माजी आमदार पप्पू कलानीची जन्मठेप सुप्रिम कोर्टाने कायम ठेवलीय. सुप्रिम कोर्टाने पप्पू कलानीची याचिका फेटाळलीय. इंदर भतिजा हत्याप्रकरणी पप्पू कलानीला जन्मठेप सुनावण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने पप्पू कलानीला जन्मठेप सुनावली होती. पप्पू कलानीने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी याचिका केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालाने हायकोर्टाने ठोठावलेली शिक्षा कायम ठेवत पप्पू कलानीला दणका दिलाय. 

Updated: May 5, 2015, 08:04 PM IST
पप्पू कलानीची जन्मठेप कायम - सुप्रीम कोर्ट title=

नवी दिल्ली : उल्हासनगरचा माजी आमदार पप्पू कलानीची जन्मठेप सुप्रिम कोर्टाने कायम ठेवलीय. सुप्रिम कोर्टाने पप्पू कलानीची याचिका फेटाळलीय. इंदर भतिजा हत्याप्रकरणी पप्पू कलानीला जन्मठेप सुनावण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने पप्पू कलानीला जन्मठेप सुनावली होती. पप्पू कलानीने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी याचिका केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालाने हायकोर्टाने ठोठावलेली शिक्षा कायम ठेवत पप्पू कलानीला दणका दिलाय. 
 
२७ फेब्रुवारी १९९० रोजी घनश्याम भटिजा नावाच्या एका व्यक्तीला उल्हासनगरमध्ये हॉटेल पिंटो पार्कच्या बाहेर रस्त्यावरच गोळी मारून हत्या केली होती. पप्पू कलानी यानं दिलेल्या आदेशावरून बच्ची पांडे, बाबा गॅब्रिएल आणि हर्षद ताहीर शेख यांनी आपल्या आणखी काही सहकाऱ्यांसोबत या घटनेचा साक्षीदार असलेला घनश्यामचा भाऊ इंदर भटिजा याची २८ एप्रिल १९९० रोजी सकाळी उल्हासनगरमधील बर्नल कारखान्यात घुसून गोळी मारली होती. महत्त्वाचं म्हणजे, घटनेच्या वेळी इंदर भटिजा याला पोलीस सुरक्षाही प्रदान केली गेली होती.

त्यानंतर आरोपींना अटकही झाली होती. पण, बचाव पक्षाच्या वकिलांनी पप्पू कलानीला जामीनावर तुरुंगातून बाहेर काढलं. त्यानंतर इतर आरोपींनाही जामीन मिळाला. या प्रकरणाचा निकाल कल्याण सत्र न्यायालयात तब्बल २३ वर्षांनी निकाल लागला. यामध्ये चौघे जण दोषी आढळले होते. तर दोघांवरचे आरोप सिद्ध न झाल्यानं त्यांना सोडून देण्यात आलं. आता, सुप्रीम कोर्टानंही पप्पू कलानीची जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.