महाराष्ट्रात वर्षातून एकदाच बनवली जाते ही खास भोगीची भाजी; एकदम सोपी रेसिपी

महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष धार्मिक महत्व आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. भोगीच्या दिवशी जी खास बाजी बनवली जाते ही महाराष्ट्रात वर्षातून एकदाच बनवली जाते. जाणून घेऊया भोगीची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी. 

वनिता कांबळे | Updated: Jan 13, 2025, 12:05 AM IST
महाराष्ट्रात वर्षातून एकदाच बनवली जाते ही खास भोगीची भाजी; एकदम सोपी रेसिपी title=

Makar Sankranti 2025: महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष धार्मिक महत्व आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. भोगीच्या दिवशी जी खास बाजी बनवली जाते ही महाराष्ट्रात वर्षातून एकदाच बनवली जाते. जाणून घेऊया भोगीची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी. 

भोगीची भाजी टेस्टी असते तितकीच ती  पौष्टिक आणि आरोग्यवर्धक देखील आहे. यामुळे  मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी प्रत्येत घरात भोगीची भाजी भाजी ही आवर्जून बनवली जाते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात  वेगवेगळ्या पद्धतीने भोगीची भाजी बनवली जाते. सोपी रेसिपी वापरुन अगदी झटपट तुम्ही ही बाजी बनवू शकता.

गावरन भोगीची भाजीसाठी लागणारे साहित्य

  • ओल्या तुरीच्या दाणे - ½ वाटी
  • ओल्या पावट्याचे दाणे - ½ वाटी
  • ओल्या हरभऱ्याचे दाणे - ½ वाटी
  • ओला ताजा मटार - ½ वाटी
  • कच्चे शेंगदाणे - मूठभर
  • गाजर - ¼ वाटी
  • घेवड्याच्या शेंगा - ½ वाटी
  • वांगी - 2 मध्यम
  • बटाटा - 1 मध्यम
  • काशीपुरी बोर - 7/8
  • उसाचे तुकडे - 5/6
  • लसणाच्या (Garlic) पाकळ्या - 12 /15
  • आलं / 1 इंच
  • हिरव्या मिरच्या - 2
  • सुकं खोबरं - 2/3 चमचे
  • पांढरे तीळ - 2 चमचे
  • खसखस- ½ चमचा
  • धणे - ½ चमचा
  • जिरे - ¼ चमचा
  • कोथिंबीर - मूठभर
  • कांदा (Onion) - 1 मधम
  • टोमॅटो - 1 मध्यम
  • तिखट - ½ चमचा
  • गरम मसाला पावडर - ¼ चमचा
  • हळद - ¼ चमचा
  • मीठ - चवीनुसार
  • तेल - आवश्यकतेनुसार
  • पाणी - गरजेपुरता

भोगीची भाजी बनवण्याची कृती 

कढईत तेल घेऊन वरील सर्व भाज्या घालून मीठ घालून  चांगले परतवून घ्या.  लसूण, हिरवी मिरची, सुके खोबरे, तीळ, खसखस, धणे, जिरे आणि कोथिंबीरची पेस्ट बनवा.  ताटात परतवलेल्या भाज्या काढून थंड होऊ द्या. त्यानंतर कढईत तेल घेऊन राई, जिरे, कढीपत्ता, कांदा आणि तयार केलेली पेस्ट घालून चांगेल परतवून घ्या. नंतर त्यात टोमॅटो आणि कोथिंबीर घालून परतवून घ्या. हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घालून चांगले परतवून घ्या.
मंदआचेवर झाकण ठेवून पेस्ट चांगल्याप्रकारे शिजू द्या. त्यात परतवलेल्या भाज्या घाला. चिमूटभर मीठ घालून मिश्रण परतवून घ्या. त्यानंतर पाणी घालून भाजीला चांगील उकळ काढून घ्या अशा रितीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने भोगीची भाजी बनवू शकता.