बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार खरचं 2025 ची सुरुवात महाभयंकर झालेय? HMPV आजारानंतर आता लॉस एंजेलिसमध्ये वणवा पेटला

Baba Vanga : बाबा वेंगा याने 2025 बाबत धडकी भरवणारी भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार खरचं 2025 ची सुरुवात महाभयंकर झालेय का? अशा काही घटना घडल्या आहेत.  

वनिता कांबळे | Updated: Jan 12, 2025, 11:45 PM IST
बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार खरचं 2025 ची सुरुवात महाभयंकर झालेय? HMPV आजारानंतर आता लॉस एंजेलिसमध्ये वणवा पेटला title=

Baba Vanga Predictions 2025 :  प्रसिद्ध भविष्यवेत्या बाबा वेंगाने 2025 या वर्षाबाबत धडकी भरवणारी भविष्यवाणी केली आहे. 2025 ची सुरुवात महाभयंकर असेल असं भाकित बाब वेंगाने वर्तवले.  बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार खरचं 2025 ची सुरुवात महाभयंकर झालेय का? अशी शंका मनात आणणाऱ्या घटना घडताना दिसत आहेत. HMPV आजारानंतर आता लॉस एंजेलिसमध्ये वणवा पेटला आहे. या घटनामुंळे संपूर्ण जगात भितीचे सावट पहायला मिळत आहे. 

नविन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच  2025 या वर्षातील पहिला महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच चीनमध्ये  एका व्हायरसनं धुमाकूळ घातला. साधारण 4 ते 5 जानेवारी दरम्यान चीनमधील HMPV व्हायरसने पुन्हा एकदा जगाला धडकी भरवली. एचएमपीव्ही आजारामुळं जगभरात खळबळ माजलीय. कोरोनाच्या तडाख्यातून जग सावरत असतानाच नव्या विषाणूजन्य आजारानं एंट्री केलीय. यामुळे जगभरातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मो़डवर आल्या आहेत. 

HMPV व्हायरस नंतर आता  अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये वणवा पेटला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस शहरातील जंगलांमध्ये लागलेली आग रहिवासी भागात पसरली आहे. या आगीत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 12 हजाराहून अधिक इमारती जळून खाक झाल्या आहेत. सध्या हेलीकॉप्टरच्या मदतीने पाण्याचे फवारे मारुन ही आग विजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

काय आहे बाबा वेंगाची 2025 ची भविष्यवाणी

2025 या वर्षाची सुरुवातीलाच विनाशकारी घटना घडतील अशी भविष्यवाणी बाबा वेंगाने केलेय. 2025 मध्ये एखाद्या मोठा आजाराच्या साथीचा सामना जगाला करावा लागू शकतो. याचा प्रसार हा आशिया खंडातील एका देशामधून होईल अशी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केली होती. यानंतर चीनमध्ये HMPV व्हायरसचा प्रसार झाला आहे. तर, दुसरीकडे लॉस एंजेलिसमध्ये वणवा पेटला आहे. 2025 पर्यंत युरोप खंडातील बहुतांश लोकसंख्या नष्ट होईल. सध्याच्या भू-राजकीय तणावाचा भविष्यात गंभीर परिणाम पहायला मिळेल असे भाकितही बाबा वेंगाने वर्तवले आहे. 

कोण आहे बाबा वेंगा?

बाबा वेंगा हा नेत्रहीन आहे. 911 मध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा याने  मरण्यापूर्वी 5079 सालापर्यंतची भविष्यवाणी केली आहे. प्रत्येक वेळी बाबावेंगाची भाकितं खरी ठरतीलच असं नाही, अनेकदा भाकितं खोटी ठरतात. तरीही बाबा वेंगाच्या भाकितांची नेहमीच चर्चा असते.