Makar Sankranti 2025: मकर संक्रात म्हंटल की डोळ्यासमोर येते ती पतंगबाजी. जसं गुजरातमध्ये संक्रांतीला पतंग उडवतात, तसं महाराष्ट्रात श्रावणत वावड्या उडवतात. महाराष्ट्रातील वावड्या उडवण्याचा दुर्मिळ खेळ गुजरातच्या पतंगबाजीला टक्कर देतो. जाणून घेऊया या अनोख्या खेळाविषयी.
इंग्रजी नवीन वर्षाच्या सुरुवातील हिंदूंचा पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत. संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यात मकर संक्रांत सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. गुजरातमध्ये मकर संक्रातीला पतंगबाजीचा आनंद लुटला जातो. महाराष्ट्राला एका वेगळ्या आणि रांगड्या पतंगाची परंपरा आहे. या रांगड्या पंतगी वावड्या म्हणून ओळखल्या जातात.
महाराष्ट्रात वावड्या उडविण्याचा हा खेळ श्रावणामध्ये खेळला जोत. ज्या गावात पाऊस कमी आणि वारा खूप असतो अशा गावांमध्ये प्रामुख्याने हा हा खेळ खेळला जातो. आजही अनेक गावात हा दुर्मिळ खेळ आणि त्याच्या स्पर्धा आवर्जून आयोजित केल्या जातात.वावडी ही पतंगासारखी दिसत असली तरी यापेक्षा कितीतरी पट मोठी असते.
6 ते 8 फूट रुंद आणि अगदी 20 फूट ऊंच इतक्या मोठा आकाराच्या या वावड्या असतात. वावड्या पतंगाप्रमाणे चौकोनी नसून आयताकृती असतात. बांबूची मोठी चौकट तयार करून त्याला साधा जाड कागद लावला जातो. मांजा नाही तर दोरखंडाच्या सहाय्याने हा वावड्या आकाशात उडवल्या जातात. या वावड्याची दोरीचे बंडल धरण्यासाठी दोन माणसे लागतात. तर या वावड्या उडविणे एका माणसाचे काम नही. यासाठी तीन चार माणसे लागतात. वावडी आकाशात झेपावल्यानंतर ती नियंत्रित करायला जमिनीवरील खेळाडूंना शक्ती आणि चातुर्य दोन्ही वापरावे लागते. कारण वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे वावड्या उडवणारेही हवेत उडू शकतात.