'मुलींनो उन्हामध्ये उपोषण नको, काळ्या पडाल'

गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप, आंदोलनाच्या पावित्र्यात असलेल्या परिचारिकांनी केला आहे. 

Updated: Apr 1, 2015, 04:49 PM IST
'मुलींनो उन्हामध्ये उपोषण नको, काळ्या पडाल' title=

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप, आंदोलनाच्या पावित्र्यात असलेल्या परिचारिकांनी केला आहे. 
आरोपांवरून पार्सेकर म्हणाले आहेत,  'मुलींनो, उन्हामध्ये उपोषणाला बसू नका, त्यामुळे तुम्ही काळ्या पडाल आणि तुम्हाला चांगला वर मिळणार नाही'.

अनुष्का सावंत नावाच्या एका परिचारिकेने सांगितले की, "ज्यावेळी आम्ही आमच्या काही मागण्या घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेलो त्यावेळी त्यांनी उन्हामध्ये उपोषणाला बसू नका. त्यामुळे तुम्ही काळ्या पडाल आणि त्यामुळे तुम्हाला चांगला वर मिळणार नाही. 

'ही अनपेक्षित प्रतिक्रिया असून मुख्यमंत्र्यांनी आमच्या अडचणी समजावून घेण्याची आम्हाला अपेक्षा होती' असेही सावंत पुढे म्हणाल्या. 

गोव्यातील परिचारिकेंसह शासनमान्य रुग्णवाहिकेच्या खाजगी सेवेतील कर्मचारी कंत्राटदाराने ३३ पैकी केवळ १३ रुग्णवाहिकाच उपलब्ध करून दिल्या आहेत. याबाबत वेळोवेळी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्याबाबत दोनवेळा प्रतिनिधींच्या गटाने मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांच्या समोर हा विषय नेण्याचे ठरविण्यात आले. 

दरम्यान मुख्यमंत्री पार्सेकर प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाही. "आम्हाला ते काय म्हणाले याबाबत काहीही कल्पना नाही. मात्र अशाप्रकारे ते कधीही बोलणार नाहीत,' अशा प्रतिक्रिया मुख्यमंत्री कार्यालयाने दिल्या आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.