'सोनियांचा वर्ण गोरा नसता तर स्वीकारले असते?'

भाजपचे खासदार गिरीराजसिंह यांनी  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सोनिया गांधींचा रंग गोरा नसता तर काँग्रेसने त्यांना अध्यक्ष म्हणून स्वीकारले असते का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Updated: Apr 1, 2015, 04:19 PM IST
 'सोनियांचा वर्ण गोरा नसता तर स्वीकारले असते?' title=

नवी दिल्ली : भाजपचे खासदार गिरीराजसिंह यांनी  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सोनिया गांधींचा रंग गोरा नसता तर काँग्रेसने त्यांना अध्यक्ष म्हणून स्वीकारले असते का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

बिहारमधील नवाडा येथील भाजपचे खासदार असलेल्या गिरीराजसिंह यांनी यापूर्वीही अशी वादग्रस्त वक्तवे केलेली आहे. आता त्यांनी सोनिया गांधींना लक्ष्य करत त्यांच्यावर वर्णभेदी टिपण्णी केली आहे. 

नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांनी पाकिस्तानमध्ये निघून जावे, त्यांना भारतात राहण्याची अधिकार नाही, असे लोकसभा निवडणुकीदरम्यान गिरीराजसिंह यांनी म्हटले होते.

गिरीराजसिंह एका न्यूज चॅनेल्सशी बोलतांना म्हणाले, "राजीव गांधी यांनी एखाद्या नायजेरियन युवतीशी विवाह केला असता आणि तिची त्वचा गोरी नसती, तर काँग्रेसने त्यांचे नेतृत्व स्वीकारले असते का? संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले तरी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मलेशियन एअरलाईन्सच्या विमानाप्रमाणे अद्याप बेपत्ता आहेत. ते अद्याप कोणाला सापडले नाहीत."

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.