उत्तर भारतात थंडीचा पहिला बळी

उत्तर भारतात थंडीच्या लाटेनं पहिला बळी घेतला आहे. सध्या येथे कडक्याची थंडी पडली आहे.

Updated: Dec 16, 2015, 09:13 AM IST
उत्तर भारतात थंडीचा पहिला बळी title=

नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीच्या लाटेनं पहिला बळी घेतला आहे. सध्या येथे कडक्याची थंडी पडली आहे.

राजस्थानात जयपूरमध्ये गारठ्यानं एका भिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होतेय. जयपूरचा पारा ५ पूर्णांक ३ अंशांपर्यंत खाली आला आहे. तर उत्तरप्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा या उत्तरेकडच्या राज्यांमध्येही थंडीची लाट आली आहे.

दाट धुक्यामुळे उत्तरेतल्या अनेक रेल्वे गाड्या उशिरानं धावतायत, तसंच विमान सेवेवरही याचा परिणाम झालाय. श्रीनगरची थंडी उणे ० पूर्णांक ३ अंशांवर पोहोचलीये. तर अमृतसरचं तापमानही २ पूर्णांक ५ अंशांपर्यंत खाली गेले आहे.