'अनपढ' नवरदेवाला नाकारून तिनं जोडलं दहावी पास 'शेतकऱ्या'शी नातं!

उत्तरप्रदेशातल्या मनिपूर जिल्ह्यातली खुशबू सक्सेना ही 'अनपढ' नवरदेवाला भरमंडपात नाकारून प्रकाशझोतात आली. याच खुशबूनं आता एका दहावी पास शेतकऱ्याशी विवाह केलाय. 

Updated: Dec 15, 2015, 11:00 PM IST
'अनपढ' नवरदेवाला नाकारून तिनं जोडलं दहावी पास 'शेतकऱ्या'शी नातं! title=

लखनऊ : उत्तरप्रदेशातल्या मनिपूर जिल्ह्यातली खुशबू सक्सेना ही 'अनपढ' नवरदेवाला भरमंडपात नाकारून प्रकाशझोतात आली. याच खुशबूनं आता एका दहावी पास शेतकऱ्याशी विवाह केलाय. 

खुशबू ही स्वत: आठवी पास आहे. नियोजित नवरदेवाला - ओमवीर ९ च्या पुढे मोजता येत नाही किंवा स्मार्टफोनही वापरता येत नाही, हे पाहून तिनं आपलं ओमवीरशी लग्न मोडलं होतं.

खुशबूनं दहावी पास शेतकऱ्याशी विवाह केल्यानं तिच्या कुटुंबीयांना आणि गावकऱ्यांनाही आनंद झालाय. त्यांनी मोठ्या थाटात खुशबूला तिच्या सासरी पाठवलंय.