तुमची जीभ तुमच्या आरोग्याविषयी बोलते...

आपल्या जीभेच्या रंग कसा आहे, हे जीभेच्या रंगावरून लक्षात येतं. 

Updated: Feb 17, 2016, 04:09 PM IST
तुमची जीभ तुमच्या आरोग्याविषयी बोलते... title=

मुंबई : आपल्या जीभेवरूनही आपलं आरोग्य कळतं, म्हणून आपल्या जीभेच्या रंग कसा आहे, आणि नेमकी शरीरात काय चाललंय, हे जीभेच्या रंगावरून लक्षात येतं. म्हणून समजून घ्या आपल्या जीभेचा रंग आपल्याला नेमका काय संकेत देतो.

निरोगी जीभ
निरोगी जीभ फिकट गुलाबी आणि ओलसर असते, यावर डाग नसतात.

जीभेवरचा जाड थर
अपचनाची समस्या, गॅस आणि शारीरीक अशक्तपणा हा संकेत असतो, व्हायरल इन्फेक्शन सुद्धा असू शकते.

जीभेवर जाड पिवळा थर
हा सर्दी, व्हायरल इन्फेक्शन, शरीरात अतिउष्णता असण्याचा संकेत, अपचनाचीही समस्या असू शकते.

चमकदार लाल जीभ
ताप, रक्तातील उष्णतेचा संकेत आहे. आंतरिक जखम, इन्फेश्नचीही शक्यता नाकारता येत नाही.

फिकट पिवळी जीभ
रक्तात कमतरता, काविळ अशक्तपणा. आतड्यावर सूज, झोपेची कमतरता, थकवा यांचा संकेत आहे.

नीळसर रंगाची जीभ
व्हिटॅमीन बी-२ची कमतरता, शरीरात वेदना आणि सूज, महिलांमध्ये पेनफुल मेन्सेसचा संकेत आहे.औषधांचा साईड इफेक्टसुद्धा असू शकतो.

जीभेचा समोरचा भाग लाल होणे
शारीरिक अशक्तपणा, मानसिक कमकुवतपणा संकेत आहे. महिलांमध्ये मेनॉपॉजच्या सुरूवातीचा संकेत आहे.

जीभेचे दोन्ही काठ जास्त लाल होणे
जास्त अल्कोहोल, मसालेदार पदार्थ आणि आतड्यांचा प्रॉब्लेमचा संकेत

जीभेवर पांढरे डाग
शरीरारतील अनेक प्रकारच्या इन्फेक्शनचा संकेत आहे. जास्त घाम येण्याचा सुद्धा संकेत असू शकतो.