दातातून सतत रक्त येत असेल तर हे उपाय करा

हिरड्यातून रक्त येत असेल, तोंडाला दुर्गंध येणे, वारंवार तोंड येणे ही सर्व पायरियाची लक्षणे आहेत. तोंडांची देखभाल नीट न केल्याने तसेच पोट स्वच्छ नसल्यास पायरियाचा त्रास संभवतो. घरगुती उपचाराने तुम्ही पायरिया बरा करु शकता. 

Updated: Feb 17, 2016, 01:54 PM IST
दातातून सतत रक्त येत असेल तर हे उपाय करा title=

मुंबई : हिरड्यातून रक्त येत असेल, तोंडाला दुर्गंध येणे, वारंवार तोंड येणे ही सर्व पायरियाची लक्षणे आहेत. तोंडांची देखभाल नीट न केल्याने तसेच पोट स्वच्छ नसल्यास पायरियाचा त्रास संभवतो. घरगुती उपचाराने तुम्ही पायरिया बरा करु शकता. 

तिळाचे तेल आणि सैंधव मीठाचे मिश्रण पायरियावर अंत्यत प्रभावी औषध आहे. तेलात सैंधव मीठ मिसळून दातांवर लावल्यास मुखदुर्गंधी तसेच रक्त येणे बंद होते आणि दात मजबूत होतात.

२०० मिली एरंडीचे तेल, ५ ग्रॅम कपूर आणि १०० मिली मध एकत्र करा. या मिश्रणात कडुनिंबाची काडी बुडवून त्याने दात घासा. या उपचाराने पायरियाचा त्रास दूर होईल. 

पेरुमध्ये व्हिटामिन कचे प्रमाण अधिक असते जे दातांसाठी लाभदायक असते. पायरियाचा त्रास झाल्यास कच्च्या पेरुवर मीठ टाकून खा. 

कडुनिंबाची पाने, कोळशाची राख आणि कपूर मिसळून रोज रात्री दात घासल्याने पायरिया दूर होण्यास मदत होते. याशिवाय हिरड्यातून येणारे रक्त, तोंडाची दुर्गंधीही दूर करतेय. कडुनिंबाच्या काडीनेही तुम्ही ब्रश करु शकता. 

दिवसातून दोन वेळा ब्रश करा. व्हिटामिन क युक्त फळे जसे आवळा, पेरु, डाळिंब आणि संत्र्याचा आहारात अधिक समावेश करा.