थंडीमध्ये वजन वाढवण्यासाठी वापरा या ७ टिप्स

वजन वाढवण्यासाठी मुली विविध उपाय करत असतात. विविध प्रकारची औषधे वजन झटपट वाढवण्याचा दावा करतात खरा मात्र तो कितपत खरा असतो ते त्यांनाच माहीत. अनेकदा अशी औषधे घेतल्याने त्याचे साईडइफेक्ट होण्याचीही भिती असते. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने वजन कसे वाढेल यावर लक्ष दिले पाहिजे. थंडीमध्ये वजन वाढवण्यासाठी वापरा या ७ टिप्स

Updated: Jan 24, 2016, 12:34 PM IST
थंडीमध्ये वजन वाढवण्यासाठी वापरा या ७ टिप्स title=

नवी दिल्ली : वजन वाढवण्यासाठी मुली विविध उपाय करत असतात. विविध प्रकारची औषधे वजन झटपट वाढवण्याचा दावा करतात खरा मात्र तो कितपत खरा असतो ते त्यांनाच माहीत. अनेकदा अशी औषधे घेतल्याने त्याचे साईडइफेक्ट होण्याचीही भिती असते. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने वजन कसे वाढेल यावर लक्ष दिले पाहिजे. थंडीमध्ये वजन वाढवण्यासाठी वापरा या ७ टिप्स

वजन वाढवण्यासाठी तुमच्या शरीरात किती कॅलरीज जातात याचे प्रमाण माहीत असणे गरजेचे आहे. कॅलरीयुक्त पदार्थांचे अधिक सेवन वजन वाढीसाठी उपयुक्त ठरते.

वजन वाढवण्यासाठी प्रोटीन डाएट घेणे गरजेचे असते. दूध, चीज. शेंगदाणे, बटर, खजूर, बीन्स यांचे सेवन करावे. सकाळी एक ग्लास बनाना शेक आणि संध्याकाळी एक ग्लास मँगो शेक वजन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. 

वजन वाढवण्यासाठी जव या धान्याचा मोठा फायदा होता. रातभर जव पाण्यात भिजत घाला. सकाळी दुधात शिजवून खीर करुन खा. यात दोन खजूरही टाकू शकता. 

बदामामुळे केवळ शरीर स्वास्थ चांगलेच राहत नाही तर त्वचाही चांगली होती. यामुळे ताकद वाढते, वजन वाढते तसेच व्हिटामिन, लोह, फॉस्फरस आणि कॅल्शियमही मिळते. 

मधामुळे पचनशक्ती वाढते. कमी वजन असलेल्या मुलींनी गरम दूधात एक चमचा मध मिसळून प्यावे. 

बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि साखर असते. ज्यामुळे शरीराला फॅट मिळते. सलाडमध्ये ग्रिल बटाटे, सँडविच अथवा विविध प्रकारे तुम्ही बटाट्याचा जेवणात वापर करु शकता. 

रोज व्यायाम केल्याने शरीर फिट राहण्यास मदत होते. काही योगासनेही जरुर करा यामउळे स्टॅमिनाही वाढतो.