जाणून घ्या जेवणानंतर आंघोळ का करु नये

योग्य वेळी आहार तसेच स्नान करणे आरोग्य निरोगी राखण्यासाठी गरजेचे आहे. मात्र काही जण जेवणाच्या तसेच आंघोळीच्या वेळा पाळत नाही. जेवणानंतर तर काहींना आंघोळ करण्याची सवय असते. मात्र ही सवय त्यांच्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. 

Updated: Aug 26, 2016, 09:32 PM IST
जाणून घ्या जेवणानंतर आंघोळ का करु नये title=

नवी दिल्ली : योग्य वेळी आहार तसेच स्नान करणे आरोग्य निरोगी राखण्यासाठी गरजेचे आहे. मात्र काही जण जेवणाच्या तसेच आंघोळीच्या वेळा पाळत नाही. जेवणानंतर तर काहींना आंघोळ करण्याची सवय असते. मात्र ही सवय त्यांच्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. 

खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ केल्यास शरीराचे तापमान कमी होते त्यामुळे शरीराचे तापमान पुन्हा नियंत्रित करण्यास रक्ताचा प्रवाह शरीराच्या बाकी भागांमध्ये होणे गरजेचे असते. 

जेवणानंतर आंघोळ केल्यास पचनशक्ती बिघडण्याची शक्यता अधिक असते. पोटाच्या भागाजवळ असलेले रक्त आंघोळीमुळे शरीराच्या अन्य भागात प्रवाहित होते. यामुळे खाल्लेले पचन होत नाही. म्हणूनच जेवणानंतर आंघोळ करु नये.