www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वतः विधानसभा निवडणूक लढवून मुख्यमंत्री होण्याच्या महत्त्वाकांक्षेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी टोला लगावलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
पण उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार का? याबाबतचा निर्णय काळानुसार घेतला जाईल, आम्हाला कुठलीही घाई नाही अशी भूमिका राऊत यांनी व्यक्त केली. राज ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेचं शिवसेनेपुढं कुठलंही आव्हान नसल्याचं राऊत म्हणाले.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कालच्या सभेत विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली. तसंच राज्याचं नेतृत्व करण्यासही उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलं. त्याच्या दोन दिवसांआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मला मुख्यमंत्री झालेलं पाहण्याची शिवसैनिकांची इच्छा असल्याचं सांगत, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचं स्पष्ट केलंय. एकूणच पुन्हा एकदा राज विरुद्ध उद्धव असा सामना रंगण्याची चिन्ह दिसतायेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.