भारतात एका गावातून दुसऱ्या गावाला एसटी बसने जोडलं आहे. त्यानंतर भारतात रेल्वेचे जाळे पसरलंय. ज्यामुळे आरामदायी, जलद आणि स्वस्त प्रवास म्हणून भारतीयांची रेल्वेला पसंती आहे. भारतात प्रत्येक राज्यात आणि शहरात रेल्वे स्टेशन आहे. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, भारतातील एका राज्य आजही रेल्वे स्टेशन नाही. आज आपण सामान्य ज्ञानमध्ये याच राज्याबद्दल जाणून घेणार आहोत. स्पर्धा परीक्षांमध्ये अशाप्रकारचे प्रश्न विचारले जातात. भारतातील हे राज्य आहे जिथे एकही रेल्वे स्टेशन त्याचं नाव सिक्कीम आहे. सुंदर लँडस्केप आणि वाढती लोकसंख्या आणि पर्यटकांची सर्वात अधिक पसंती असून या राज्यात एकही रेल्वे स्टेशन नाही. यामागील कारण जाणून घेऊयात.
भारतीय रेल्वे प्रणाली ही जगातील चौथ्या क्रमांकाची आणि आशियातील सर्वात मोठी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संपूर्ण रेल्वे नेटवर्क अंदाजे 70,000 किलोमीटर असून 7,000 हून अधिक स्थानकं आहेत. दररोज 13,000 हून अधिक प्रवासी गाड्या आणि 8,000 हून अधिक मालवाहू गाड्या इथे धावतात. ज्यामुळे ते भारताच्या वाहतूक नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग बनते. (The only state in India without a single railway station Sikkim Know why)
सिक्कीम हे भारतातील एकमेव राज्य आहे ज्याच्या सीमेवर कोणतेही रेल्वे स्टेशन नाही. हे राज्य हिमालयाच्या कठीण प्रदेशात वसलेले असल्याने, खडकाळ टेकड्या आणि आव्हानात्मक लँडस्केप, रेल्वे संपर्क टिकवून ठेवणे रेल्वे अधिकाऱ्यांसाठी कठीण काम झालंय. असे असूनही, सिक्कीम रस्ते आणि हवाई मार्गाने चांगले जोडलेले असून जवळची रेल्वे स्थानके शेजारच्या पश्चिम बंगालमध्ये आहेत. सिक्कीमच्या जवळ दोन रेल्वे स्टेशन आहेत. एक सिलीगुडी रेल्वे स्टेशन आणि न्यू जलपाईगुडी रेल्वे स्टेशन आहेत. सिक्कीमपासून सुमारे 114 किलोमीटर अंतरावर असलेले, सिलीगुडी हे या प्रदेशासाठी एक प्रमुख वाहतूक केंद्र आहे. त्यानंतर सुमारे 125 किलोमीटर अंतरावर असलेले, न्यू जलपाईगुडी हे सिक्कीमला रस्त्याने प्रवेश देणारे दुसरे प्रमुख स्थानक आहे.
सिक्कीममध्ये सध्या रंगपो नावाच्या रेल्वे स्टेशनचे बांधकाम सुरू आहे. पूर्ण झाल्यानंतर, हे स्टेशन रंगपो शहर आणि सिक्कीमच्या तीन जिल्ह्यांना जोडेल. यामुळे राज्यातील वाहतूक आणि कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि उर्वरित भारताला एक महत्त्वाचा दुवा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
तर भारताच्या ईशान्य भागात असलेल्या मिझोराममध्ये एकच रेल्वे स्टेशन असून त्याच नाव बैराबी आहे. हे स्टेशन कोलासिब जिल्ह्यात आहे. मर्यादित रेल्वे सुविधा असूनही, मिझोराम हे रस्ते आणि हवाई नेटवर्कद्वारे उर्वरित भारताशी चांगले जोडलेले आहे. मिझोरामनंतर दुसरे ईशान्येकडील राज्य मेघालयमध्ये मेंडीपठार हे एकमेव रेल्वे स्टेशन आहे. हे पूर्व गारो हिल्स जिल्ह्यात वसलेले आहे. राज्यात रेल्वे मर्यादित असली तरी रस्ते वाहतूक हे संपर्काचे प्राथमिक साधन राहिलंय.