BHEL Engineer Trainee Recruitment 2025: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये शेकडो पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये 20 जानेवारी 2025 रोजी इंजिनीअरिंग ट्रेनी आणि सुपरवायझर ट्रेनी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. याची अर्ज प्रक्रिया 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. उमेदवार 1 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी संबंधित शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) ने इंजिनीअरिंग ट्रेनी आणि सुपरवायझर ट्रेनी(टेक)च्या एकूण 400 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यापैकी 250 पदे इंजिनीअरिंग ट्रेनीसाठी राखीव आहेत. ज्यामध्ये विविध तांत्रिक शाखांनुसार रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. इंजिनीअरिंग ट्रेनी पदांमध्ये मेकॅनिकल क्षेत्रासाठी 70, इलेक्ट्रिकलसाठी 25, सिव्हिलसाठी 25, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 20, केमिकलसाठी 5 आणि मेटलर्जीसाठी 5 पदांचा समावेश आहे. पर्यवेक्षक प्रशिक्षणार्थी (टेक) साठी 150 पदे जाहीर करण्यात आली आहेत. त्यापैकी 140 यांत्रिक क्षेत्रासाठी, 55 इलेक्ट्रिकलसाठी, 35 सिव्हिलसाठी आणि 20 इलेक्ट्रॉनिक्ससाठी आहेत. या रिक्त पदासाठी लागणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार त्यांच्या पात्रता आणि अनुभवाच्या आधारे या पदांसाठी अर्ज करू शकतात आणि भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.
BHEL प्रशिक्षणार्थी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट careers.bhel.in वर जा. होमपेजवर रिक्रूटमेंट ऑफ इंजिनिअर ट्रेनी अँड सुपरवायझर ट्रेनी (टेक) 2025 या लिंकवर क्लिक करा. यानंतर Apply Online चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. पुढे सर्व आवश्यक तपशील भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा. सर्वात शेवटी अर्ज सबमिट करा आणि कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा.
BHEL प्रशिक्षणार्थी भरतीसाठी अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे. जनरल (यूआर), ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांकडून 795 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल. पीडब्ल्यूबीडी (बेंचमार्क अपंगत्व असलेली व्यक्ती), माजी सैनिक आणि एससी/एसटी श्रेणीतील उमेदवारांकडून 295 अर्ज शुल्क घेण्यात येईल. उमेदवारांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इतर ऑनलाइन पेमेंट माध्यमातून अर्ज शुल्क भरता येणार आहे.
28 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारींनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्या.