www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिकचे उमेदवार प्रदीप पवार यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी आज एकाच दिवशी नाशिकमध्ये दोन सभा घेतल्या. दोन्हीही सभेत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि गुजरातच्या विकासावर स्तुतीसुमनं उधळली.
ही सभा मनसेची की भाजपची असा प्रश्न उपस्थितांना पडावा, इतपत राज ठाकरेंच्या तोंडून सलग नरेंद्र मोदींचीच स्तुती ऐकायला मिळाली. यावेळी, मोदींना पाठिंबा कुणावर कुरघोडीसाठी नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. मात्र, शनिवारी `सामना`च्या अग्रलेखात आपल्यावर केलेल्या टीकेबद्दल एक शब्दही काढला नाही.
राज ठाकरेंनी ठाकरे बंधुंत सुरु झालेल्या वादाला स्वल्पविराम देत वाद थांबविला होता... पण, सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा राजला डिवचण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळेच, राज ठाकरे पुन्हा यावर काय बोलणार? याकडे उपस्थितांचं लक्ष लागून होतं. मात्र, त्यांची निराशाच झाली.
काय म्हणाले राज ठाकरे पहिल्या सभेत
* गेली १० वर्ष आम्ही तेच तेच बोलतोय... आम्हाला बोलून कंटाळा येतो, तुम्हाला ऐकून कसा येत नाही?
* आमच्या डॉ. प्रदीप पवारांची खात्री देतो तुम्हाला
* हा तुमचा, मराठी माणसाचा अपमान - राज
* अजित पवारांवर बरसले राज
* काँग्रेस-राष्ट्रवादीवर घराणेशाहीवरून टीका
* हातही छाटावा लागेल, हातावरचं घड्याळही काढावं लागेल
* गुजरातमधील कामांची स्तुती
* राज ठाकरेंनी पुन्हा उधळली मोदींवर स्तुतीसुमनं
* मोदी पंतप्रधान व्हायला हवेत, हे तेव्हाच सांगितलं - राज
* २०१० साली मी सांगितलं होतं - राज ठाकरे
* माझे खासदार निवडून येणार आणि मोदींना पाठिंबा देणार
* खरं बोललो की कोर्टात खेचतात
काय म्हणाले राज ठाकरे दुसऱ्या सभेत
* अबू आझमी यांच्यावर टीका
* परप्रांतियांच्या मुद्दा घेतला उचलून
* राज ठाकरेंनी पुन्हा वाचलं गुजरात विकासाचं पुराण
* मोदींना पाठिंबा कुणावर कुरघोडीसाठी नाही - राज
* माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी धिंगाणा करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा
* मनसे खासदारच निवडून येणार, मोदींना पाठिंबा देणार
* नाशिकमधली राज ठाकरेंची आजची दुसरी सभा
* प्रदीप पवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे नाशिकमध्ये
* राज ठाकरे नाशिकमध्ये
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.