www.24taas.com, झी मीडिया, पुणे
शिवसेनेची परिस्थिती बिकट आहे, त्यांच्याकडे मुददे नाहीत. म्हणून ते वडा आणि सूपवर आलेत, अशी टीका नारायण राणेंनी पुण्यात केलीय.
शिवसेनेला राज्यात 3 ते 4 जागा मिळतील, असा दावाही राणेंनी केलाय. त्याचबरोबर घरातलं भांडण घरातच ठेवावं, असा सल्लाही त्यांनी राज-उद्धवना दिलाय. तुमची काहीही भांडणे असोत, त्याचे जनतेला देणं घेणं नाही. अशी भांडणे चव्हाट्यावर आणणे योग्य ऩाही. या भांडणाचा लाभ काँग्रेसलाच होणार आहे, असा दावा राणे यांनी केला.
या लोकसभा निवडणुकीत माझी औकात तुम्हाला दाखवूनच देतो, असे राज ठाकरे यांनी उद्धव यांना आव्हान दिले. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या पाठित खंजिर खुपणाऱ्यांकडून काय अपेक्षा बाळगाच्या अशी टीका केली. त्यावरून राज ठाकरे यांनी पलटवार करताना उद्धव यांच्यावर जहरी टीका केली. बाळासाहेबांना वडे दिले जात होते. मी ते पाहिले आणि माझ्या घरून सूप दिले, असे सांगत हल्लाबोल केला. त्यावरून ठाकरे बंधुमध्ये सामना रंगला.
या टिकेला पुन्हा शिवसेनेकडून उत्तर दिले गेले. सामनाच्या अग्रलेखातून टीका केली गेली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे लाखोंचे पोशिंदे होते. बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या पोटाची भाषा केली. ज्यांना लायकी नसताना `सुपा`एवढे दिले, ते बाळासाहेबांना पाठवलेल्या एका चिकन सुपाचे बिल जाहीर सभांतून फडकवतात. हा निर्लजपणाच नाही काय?, असा खरमरीत अग्रलेख `सामना` या शिवसेनेच्या मुखपत्रात लिहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जोरदार चिमटा काढला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.