अक्षय कुमार आणि `बीग बी`चे मतभेद उघड!

रजनीकांत जोक्स सध्या भलतेच फॉर्मात आहेत... सध्या सोशल साइट्वरही रजनीकांतवर बरेच विनोद वायरल झालेले दिसतात.

Updated: Mar 23, 2014, 10:22 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रजनीकांत जोक्स सध्या भलतेच फॉर्मात आहेत... सध्या सोशल साइट्वरही रजनीकांतवर बरेच विनोद वायरल झालेले दिसतात.
पण, रजनीकांत यांच्यावर विनोद करण्यास आता बॉलीवूड मंडळीही मागे राहिली नाहीत... आणि हेच निमित्त ठरलंय अभिनेता अक्षय कुमार आणि बीग बी यांच्यातील मतभेदांचं...
त्याचं झालं असं की, बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी रजनीकांत आणि गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेल्या मलेशियाच्या विमानाबद्दल एक ट्विट केलंय. एक मजेदार पद्धतीचं अमिताभ यांचं हे ट्विट आहे...
यामध्ये, सोशल साइट्वर सतत अपडेट राहणारे बिग बी यांनी गेल्या काही दिवसापासून बेपत्ता असलेल्या मलेशिया एअरलाइन्स विमानाचं रहस्य हास्यात उडवलंय. अमिताभ यांनी... `रजनीकांत... पुरे झाले आता! तू जिंकलास ओके! आता आम्हाला सांग ते विमान कुठे आहे` असं ट्विट केलंय.
(अमिताभ यांचं ट्विट - T 1425 - A contribution sent on my sms : "OK Rajnikanth ... enough is enough !! You win OK !! Now tell us where that plane is .." - Amitabh Bachchan (@SrBachchan) March 21, 2014)
मात्र, याविषयी अक्षय कुमारनं मात्र अत्यंत संवेदनशीलपणे ट्विट केलंय. अक्षयनं यावर दु:खद प्रतिक्रिया व्यक्त केलीय. बेपत्ता झालेल्या विमानावरचा विषय हा सोशल वेबसाईटवरील जोक्स होऊ शकत नाहीत असं त्याला वाटतंय.
अक्षय ट्विट करतो, ‘गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विमान एमएच ३७० बद्दल अनेक विनोद केले जात आहेत. काही लोकांनी तर टॅक्सीची एमएच ३७० असलेली नंबर प्लेटचे फोटो पोस्ट करुन ते ‘बेपत्ता एमएच ३७० सापडले’ असे विनोद केलेत... मला माहित आहे की, तांत्रिक बिघाड हे एक अपयश आहे. मात्र अशा वर्तनानं तुम्ही एक माणून म्हणून अपयशी ठरता’.
(अक्षयचं ट्विट - Since the past couple of days seeing some distasteful jokes about the missing #MH370. Seriously people posting, `Missing MH 370 found` with a pic of a cab having a MH 370 no. plate is not funny! I know it`s a huge failure on the technological front but this behavior is your failure as a human being. Have a heart and be a tad more sensitive).
मलेशिया एअरलाइन्सचे विमान ८ मार्च २०१४ पासून बेपत्ता आहे. या विमानात १२ क्रू मेंबरसह २३९ प्रवासी होते. त्यात भारतीयांचाही समावेश आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.