मोदींची लाट ही मीडियाची - शरद पवार
सध्या चर्चेत असलेली नरेंद्र मोदींची लाट म्हणजे एका पक्षाची, व्यक्तीची आणि मीडियानं निर्माण केलेली लाट असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
पहिली पसंती, राजकीय प्रचार `व्हॉट्सअॅप्स`वर
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकारणी नेते प्रचारांसाठी वेगवेगळे फंडे वापरताना आपण पाहिलेचं आहेत.
मीडियाबाबत सुशीलकुमार शिंदेंची कोलांटी
सोलापूरमध्ये मीडियावर टार्गेट करताना मीडियाला ठेचण्याची वेळ आली आहे, अशी धमकी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली होती. मात्र, या वादग्रस्त व्यक्तव्यावर शिंदे यांनी घुमजाव केले आहे. आपल मीडियाला नाही तर सोशल मीडियाला म्हटले, असा खुलासा शिंदे यांनी केलाय.
सूफी गायक हंसराज यांनी स्वीकारला इस्लाम?
मूळ पंजाबचे सूफी गायक, पद्मश्रीप्राप्त हंसराज हंस यांनी पाकिस्तानात इस्लाम धर्म स्वीकारलाय, अशा आशयाच्या बातम्यांनी सध्या पाकिस्तानातील मीडियात जोर पकडलाय.
आंदोलन फसलं... 'चर्चा' तर होणारच!
टोलच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुरू केलेलं रास्ता रोको आंदोलन अवघ्या ३६० मिनिटांत संपलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी सकाळी चर्चेसाठी बोलावल्यानं, राज ठाकरेंनी ३६० अंशात यू टर्न घेत, आंदोलन मागे घेतलं. चर्चाच करायची होती, तर आजचं आंदोलन करून राज ठाकरेंनी काय साधलं? असा सवाल उपस्थित केला जातोय.
राज ठाकरे - मुख्यमंत्री चर्चा मीडियासमोर?
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पोलिसांनी अडिच तास ताब्य़ात घेतल्यानंतर सोडून देण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना फोन करून चर्चेचं आमंत्रण दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा राज ठाकरेंनी केलीय.
मोदींकडून किती पैसे घेतले- सोमनाथ भारतींचा मीडियावर आरोप
आधीच छापा प्रकरणावरून वादग्रस्त राहीलेले दिल्लीचे कायदामंत्री सोमनाथ भारती आज पुन्हा नव्या वादात सापडले. मीडियावर मोदींकडून पैसे घेतल्याचा आरोप त्यांनी केला. अखेरीस थोड्यावेळानं त्यांना समस्त पत्रकारांची माफी मागावी लागली.
सेकंड इनिंग संपण्याआधी....पंतप्रधान आज बोलणार
२०१४च्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग प्रथमच आज पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. विधानसभा निवडणुकांमधील काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच बोलणार आहेत. त्यातच पंतप्रधानपदाची सेकंड इनिंग संपण्याआधी ते मीडियाला सामोरे जात असल्यानं ते काय बोलतायत, याकडे सगळ्या देशाचंच लक्ष लागलंय.
मीडियावर निर्बंध घालण्याची आसारामची मागणी
मीडियानं आपल्यासंबंधी नकारात्मक बातम्या देणं थांबवण्याचा आदेश देण्याचा आदेश देण्याची मागणी, सध्या तुरुंगात असलेल्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूनं सर्वोच्च न्यायालयाकडे केलीय. सोळा वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आसाराम बापू सध्या तरुंगाची हवा खात आहे.
मोदी मीडियाच्या जीवावर मोठे झालेत- दिग्विजय सिंग
काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ‘नरेंद्र मोदी हे मीडियाच्या जीवावर मोठे झालेले नेते आहेत. त्यांनी कुठलंही मोठं कार्य केलेलं नाही’, असा आरोप दिग्विजय सिंगांनी मोदींवर केला आहे.
तिला सावरू द्या, गर्दी कमी करा- मुलीच्या आईची विनवणी
‘कुणाच्याही नशिबी येऊ नये ते माझ्याच मुलीच्या वाट्याला आलं... दुर्दैव! या पाशवी अत्याचाराच्या जखमा शरीरावर आहेत त्याहून अधिक तिच्या मनावर आहेत. पण ती खचली नाही. ती पुन्हा उभी राहील
फिक्सिंग प्रकरणात शिल्पा शेट्टी मीडियावर भडकली
पासपोर्ट जप्त केल्याची बातमी देणाऱ्या मीडियावर राज कुंद्रा आणि त्यांची पत्नी, अभिनेत्री शिल्पा शेट्टी चांगलेच भडकलेत. या दोघांनी ट्विटरवरून आपला राग व्यक्त केला आहे.
आता तुमचा अभ्यासक्रम बदलणार, मीडियाचाही अभ्यास करावा लागणार
मुबंई विद्यापीठाच्या सोमवारी पार पडलेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत ११ नव्या अभ्यासक्रमांना मंजुरी देण्यात आली. टीवाय बीए, एमएच्या अभ्यासक्रमात बदव करण्यात आला असून एसवाय बीकॉममध्ये तीन नव्या विषयांची भर घालण्यात आली आहे.
मीडियासाठी काळा दिवस, द्या आपल्या प्रतिक्रिया
मीडियाची राजकीय नेत्यांकडून होणारी मुस्कटदाबी याचा निषेध म्हणून आज `काळा दिवस` पाळण्यात येतो आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या मीडियावर येणारी बंधने यांचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे.
`...ही तर मीडियाची मुस्कटदाबी`
‘झी न्यूज’च्या संपादकांवर झालेली कारवाई एकतर्फी असल्याची टीका जेडीयू नेते शरद यादव यांनी केली आहे. या कारवाईविरोधात संसदेत आवाज उठवणार असल्याचं यादव यांनी म्हटलंय. तर हा मीडियाच्या मुस्कटदाबीचा प्रयत्न असल्याची टीका काँग्रेसचे नेते मुक्तार नक्वी यांनी केलीय.
संपादकांची अटक बेकायदेशीर, त्वरीत सुटका करा - झी न्यूज
‘झी न्यूज’नं झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी आणि झी बिझनेसचे संपादक समीर अहलुवालिया यांना केलेल्या अटकेचा जोरदार निषेध केलाय. कोळसा खाण घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या या प्रकरणात संपादकांना केलेली ही अटक बेकायदेशीर असून त्यांची तत्काळ सुटका व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आलीय.
बाई, मी विकत घेतला मीडिया!
आपल्या बातम्या बाहेर येऊ नयेत यासाठी बड बडे उद्योगपती मीडियाला विकत घेतात..कोळसा घोटाळ्यामुळे वादाच्या भोव-यात सापडलेले उद्योगपती नवीन जिंदाल यांच्यासाठी हा खेळ नवा नाही. याचा खुलासा करण्यासाठी कोणत्या पुराव्याचीही गरज नाही..
मीडियाने सनसनाटी बातम्या देऊ नये- मनमोहन सिंग
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यावर होणारे आरोप, त्यानंतर मनमोहन सिंग यांना विरोधकांनी `टार्गेट` करणं, ह्या साऱ्याचं खापर मनमोहन सिंग यांनी मीडियावर फोडलं आहे.
माहित्या घेऊन सांगतो !
मराठीच्या कुठल्याही शब्दकोशात नसणारा “माहित्या”हा शब्द आपल्या राज्याचे गृहमंत्री ‘माननीय’ आणि ‘सन्मानीय’ आर. आर. पाटील ऊर्फ आबांच्या शब्दकोशात मात्र नक्की आहे...
‘आदर्श’ वाढतोय, गाजतोय आणि बडवला जातोय
प्रसाद घाणेकर ‘आदर्श’ सोसायटी घोटाळा वाढतोय, गाजतोय, वाजतोय आणि बडवला जातोय. जेवढं झाकलं जातयं तेवढं उघडं होतंय. चौकशी आयोगासमोर येणारे ‘चार बोटं’ आपल्याकडे ठेवून एका बोटाने दुस-याचंनाव सूचकरणे सुचवत आहेत. ‘तू-तू मै-मै’बरोबर ‘तो-तो’चा आणि ‘तो मी नव्हेच’ करत ‘सही रे सही’चं नाट्य रंगलंय.