पहिली पसंती, राजकीय प्रचार `व्हॉट्सअॅप्स`वर

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकारणी नेते प्रचारांसाठी वेगवेगळे फंडे वापरताना आपण पाहिलेचं आहेत.

Updated: Mar 4, 2014, 12:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकारणी नेते प्रचारांसाठी वेगवेगळे फंडे वापरताना आपण पाहिलेचं आहेत. या फंड्याचा असर कमी होत आहे की काय, म्हणून निवडणूक लक्षात घेऊन राजकारणी नेत्यांनी `व्हॉट्सअॅप`चा सारख्या ग्रुप मॅजसेजिंग सिस्टमचा आधार घेतला आहे.
आजकाल सर्वच नेतेमंडळी फेसबुक आणि ट्विटर यासारख्या सोशल साईटवर अॅक्टिव्ह असतात. मात्र ट्विटरसारख्या सोशल साईटची फक्त १४० शब्दांची मर्यादा आड येते. मात्र व्हॉट्सएपमध्ये अशी शब्दांची कोणतीच मर्यादा नाही. व्हॉट्सएपचे जगात ४५ करोड युझर आहेत.
मतदारसंघ, मतदार आणि पक्ष यांच्याशी कनेक्ट राहण्यासाठी `व्हॉट्सअॅप` चांगलचं उपयुक्त ठरणार आहे. `व्हॉट्सअॅप`मध्ये मतदारसंघाचे आर्थिक, सामाजिक आणि जातीनुसार ग्रुप करु शकतो. राजस्थान, दिल्ली आणि ओडिशाचे काही नेते तर `व्हॉट्सअॅप`चा चांगलाच फायदा करुन घेत आहेत तर काही नेतेमंडळी अॅप्स शिकून घेत आहेत.
निवडणुकासाठी प्रचार करणाऱ्या बहुतेक सर्वच पक्षांना यांची ताकद कळली आहे. म्हणूनचं काँग्रेस आणि बीजेपीसारखे मोठे पक्ष पण `व्हॉट्सअॅप`चा वापर मतदानांसाठी करणार असून, त्यांनी त्यांचे नंबर पण प्रसिद्ध केले आहेत. काँग्रेसचा नंबर - ८३९८९८९८९८ आणि बीजेपीच्या मिशन २७२ + साठी नंबर - ७८२००७८२०० आहे.
कसा करायचा `व्हॉट्सअॅप`चा वापर
`व्हॉट्सअॅप` एक मोबाईल फोन अॅप्लिकेशन असून, यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम आहे. मोबाईलमध्ये `व्हॉट्सअॅप` इंस्टॉल केल्यानंतर, लगेच फोनबुकमध्ये पहिल्यापासून `व्हॉट्सअॅप` वापरत असलेल्या युझरचा नंबर सर्च करते. फेसबुकप्रमाणे आपण `व्हॉट्सअॅप`मध्ये प्रोफाईल फोटो आणि स्टेटस पण आपण ठेवू शकतो. तसेच आपण `व्हॉट्सअॅप`मध्ये फोटो, ऑडियो नोट्स आणि व्हिडियो मॅसेज पण करु शकतो.
`व्हॉट्सअॅप` आईफोन, ब्लॅकबेरी, अॅंड्राईड आणि नोकिया मोबाइलवर उपलब्ध आहे. `व्हॉट्सअॅप` हे विनाशुल्क आहे. मात्र हा अॅप्स इंटरनेटवर चालणारा असल्यामुळे इंटरनेटचा खर्च आपल्याला करावा लागतो. असे हे `व्हॉट्सअॅप` सोशल मीडीयापेक्षा स्वस्त आणि मस्त अॅप आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.