कलमाडी सुटले, मात्र मीडियापासून सटकले,
तिहार तुरुंगातून पुण्याचे खासदार सुरेश कलमाडींची आज जामीनावर सुटका झाली. तब्बल नऊ महिन्यांच्या कारावासानंतर कलमाडी जेलबाहेर आले. मिडीयाला हुलकावणी देत ते मार्गस्थ झाले.
ऑस्ट्रेलियन मीडियाचे टीम इंडियावर ताशेरे
ऑस्ट्रेलियन मीडियानं टीम इंडियावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महेंद्रसिंग धोनी निष्क्रिय कॅप्टन असल्याच म्हणत त्यांनी धोनीलाही टीकेच लक्ष्य केलं आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणनं कांगारु बॉलर्ससमोर सपशेल शरणागती पत्करली आहे.
'मीडियावर बाहेरचं नियंत्रण असू नये' - पीएम
अण्णांचे आंदोलन असो किंवा, टूजी घोटाळा यासारख्या महत्वाच्या घटनानां मीडियाने उत्कृष्ट रित्या न्याय दिल्याने मीडियामुळे अनेकांवर वचक राहतो. त्यामुळेच मीडियावर बाहेरचं नियत्रणं असू नये असं पंतप्रधान डॅा. मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे
युद्ध आमुचे सुरू.....
‘हिंमत असेल तर सोनिया गांधींनी मीडिया आणि जनतेसमोर लोकपालावर चर्चा करावी’ असं आव्हानच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिलं आहे. तर दुसरीकडे अण्णांना चोख उत्तर देण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यादेखील पुढे सरसावल्या आहेत.
सोशल नेटवर्किंग नव्हे... 'नॉटवर्किंग'
सचिन सावंतइंटरनेट आलं त्यांनी जगाचा चेहरामोहराच बदलून टाकला, क्षणार्धात एका ठिकाणाची बातमी दुसऱ्या ठिकाणी यासारख्या गोष्टी सहजपणे होऊ लागल्या. भारतात या सोशल मीडियावर काहीही बंधने नाहीत मात्र आक्षेपार्ह मजकूरावर बंधने आली पाहिजेत.