मुंबई : मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपमध्ये चकमक झडली. उत्त र मुंबईतल्या बोरिवली पश्चिममधल्या गोराई इथल्या उद्यानावरुन, शिवसेना भाजपमध्ये ही धुमश्चक्री घडली.
या उद्यानातल्या व्यायामशाळेत शिवसेनेच्या संध्या दोषी यांनी कचरा डबे साठवल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. भाजपाच्या अंजली खेडेकरांनी यावर हरकतीचा मुद्दा मांडला. तसंच दोषींवर कारवाईची मागणी भाजपनं केली.
त्यानंतर पालिका सभागृहात भाजपकडून डब्बे चोर अशी घोषणाबाजी केली गेली. त्याला शिवसेनेनं मोदी चोरच्या घोषणांनी प्रत्युत्तर दिलं. तर भाजपच्या ज्योती अळवणी, राजश्री शिरवडकर आणि सेनेच्या राजूल - पटेल, किशोरी पेडणेकरांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.