PM Modi Mumbai: पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात धक्कादायक प्रकार; NSG कमांडोला BKC पोलिसांकडून अटक

पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या  मुंबई दौऱ्यात धक्कादायक प्रकार घडला. मुंबईतील सभेत शिरलेल्या  बोगस  NSG कमांडोला BKC पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच पंजाब येथे पंतप्रधान मोदीच्या रोड शो दरम्यान अक्षम्य चूक झाली होती. 

Updated: Jan 21, 2023, 04:41 PM IST
PM Modi Mumbai: पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात धक्कादायक प्रकार;  NSG कमांडोला BKC पोलिसांकडून अटक title=

PM Modi Visit Mumbai : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे 19 जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर आले होते. मुंबई मेट्रोसह विविध कामांचे लोकार्पन यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी  वांद्रे येथील बीकेसी ग्राऊंडवर (BKC Mumbai) जाहीर सभा घेतली. मात्र, या सभेत धक्कादायक प्रकार घडला. पंतप्रधान मोदींच्या सभेत घुसणाऱ्या नकली NSG कमांडोला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे (Suspicious NSG commando arrested). 

मुंबई दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत प्रवेश करणाऱ्या एका बनावट पोलिसांनी ताब्या घेतले आहे.  राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) नावाचे बनावट ओळखपत्र वापरून त्याने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) पोलिसांनी याला अटक केली आहे.

रामेश्वर मिश्रा असे आरोपीच नाव आहे. तो नवी मुंबईचा रहिवासी आहे. रामेश्वर भारतीय सैन्याच्या गार्ड रेजिमेंटचा शिपाई असल्याचा दावा करत आहे. बीकेसी पोलीस आता त्याच्या पोलीस स्टेशनची पडताळणी करत आहेत. एमएमआरडीए मैदानावर एंट्री पॉईंटचे व्यवस्थापन करणाऱ्या पोलिस कर्मचार्‍यांच्या पथकाने मिश्रा यास अडवत त्याला ताब्यात घेतले. 

रामेश्वर विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि, लष्कर, आयबी, दिल्ली पोलिस आणि पंतप्रधान सुरक्षा अधिकारी यांसारख्या विविध एजन्सी त्याची माहिती घेत आहेत की तो व्हीव्हीआयपी विभागात का जाण्याचा प्रयत्न करत होता.

PM मोदींचं सुरक्षा कवच भेदून रोड शोमध्ये शिरला होता तरुण

कर्नाटकातील हुबळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शो दरम्यान हलगर्जीपणा झाल्याचा प्रकार 12 जानेवारी 2022 रोजी उघडकीस आला होता. या रोड शो दरम्यान अक्षम्य चूक झाली होती.  एक तरुण हातात हार घेऊन थेट पंतप्रधान मोदींच्या अगदी जवळ पोहचला. या नंतर पंतप्रधान मोदींसोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी झटापट हालचाली करत या व्यक्तीला अडवले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पंतप्रधान मोदींभोवती असलेले सुरक्षेचे कवच भेदून हा व्यक्ती थेट पंतप्रधान मोदींच्या जवळ कसा पोहचला असा प्रश्न उपस्थित झाला होता. 

जानेवारी 2022 मध्ये पंजाब दौऱ्यात नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत झाली होती मोठी चूक 

यापूर्वी देखील जानेवारी 2022 मध्ये पंजाब दौऱ्यावर (Punjab Visit) असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक झाली होती.  फिरोजपूर ते भटिंडा प्रवासादरम्यान पंतप्रधान मोदींचा ताफा आंदोलकांनी अडवला होता.