Politics News : कोण होणार शिवसेना पक्षप्रमुख? 23 जानेवारीनंतर उद्धव ठाकरे यांची खूर्ची जाणार का?

Shiv Sena President: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाल 23 जानेवारी रोजी संपत आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात शिवसेना पक्षावर नियंत्रण मिळविण्याबाबत लढाई सुरु आहे. असे असताना आता नव्या पक्ष प्रमुख निवडीबाबत खास रणनिती आखण्याची तयारी सुरु झाली आहे.

Updated: Jan 21, 2023, 03:13 PM IST
Politics News : कोण होणार शिवसेना पक्षप्रमुख? 23 जानेवारीनंतर उद्धव ठाकरे यांची खूर्ची जाणार का? title=

Shiv Sena News: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर गतवर्षी जूनमध्ये भाजपच्या पाठिंब्याने शिवसेनेतून ( Political News) बाहेर पडलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात शिवसेना पक्षावर ताबा मिळविण्यासाठी संघर्ष सुरु आहे. (Maharashtra Politics News) आता पुढचा वाद पक्षप्रमुख पदाचा आहे. (Shiv Sena President) उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena) यांनी निवडणूक आयोगाकडे पक्षांतर्गत निवडणुका घ्याव्यात किंवा यथास्थिती ठेवावी अशी विनंती केली आहे. याबाबत आयोगाने अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही. अशा स्थितीत 23 जानेवारीनंतर पक्षाचे प्रमुख कोण होणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. (Maharashtra Political News) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपत आहे. (Maharashtra News in Marathi)

Shiv Sena Symbol EC Hearing : पुढील सुनावणी आता 30 जानेवारीला होणार

ठाकरे समर्थक तेच शिवसेनेचे पुढील अध्यक्ष असल्याचा दावा करत आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आणि नेत्यांसाठी उद्धव ठाकरे हेच शिवसेना पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि राहतील, कार्यकर्त्यांना कोणत्याही परवानगीची गरज नाही, असे उद्धव गटाचे नेते अनिल परब यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्ही निवडणूक आयोगाकडे कायदेशीर औपचारिकता पाळण्यासाठी परवानगी मागितली होती.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांनी शुक्रवारी निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद पूर्ण केला आणि दोघांनीही आपणच खरी शिवसेना असल्याचे म्हटले आहे. सुनावणीअंती आयोगाने सांगितले की, जर काही निवेदन असेल तर दोन्ही पक्ष 30 जानेवारीपर्यंत लेखी स्वरुपात सादर करु शकतात.

'शिवसेनेच्या घटनेत 'प्रमुख नेते' पदाची तरतूद नाही'

परब म्हणाले, 'पक्षात केवळ खासदार आणि आमदारांचा समावेश नसून त्यात राष्ट्रीय कार्यकारिणी आणि पक्ष संघटना यांचा समावेश आहे, असा युक्तिवाद आमच्या वकिलांनी केला. त्यात बहुमत आमच्याकडे आहे,असे म्हटलेय. 2018 च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या फेरनिवडीवर कोणीही प्रश्न उपस्थित केला नव्हता, आता अचानक शिंदे गट प्रश्न उपस्थित करत आहे. शिवसेनेच्या घटनेत 'प्रमुख नेते' पदाची तरतूद नाही, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्या पदावर झालेली निवड अवैध आणि घटनाबाह्य असल्याचा दावा त्यांनी केला, ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

शिंदे गटाचा युक्तिवाद 

दुसरीकडे, शिंदे गटाचे वकील निहार ठाकरे यांनी दिल्लीतील प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, निवडून आलेले बहुसंख्य लोकप्रतिनिधी त्यांच्यासोबत असल्याने निवडणूक आयोगासमोरच खरी शिवसेना असल्याचा युक्तिवाद केला.