मुंबई : विधानसभेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावावर भाषण केले. भाजपनेते सुधीर मुंगटीवार यांनी यावेळी विरोधकांवर टीका करीत घणाघाती भाषण केले.