दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा मे महिन्यात

 दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा मे महिन्यात 

Updated: Nov 6, 2020, 12:35 PM IST
दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा मे महिन्यात  title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा मे महिन्यात घेतली जाणार आहे. २३ नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 

कोरोनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा लांबणीवर जाणार असल्याचे म्हटले जात होते. मार्चमध्ये होणारी दहावी आणि बारावीची परीक्षा मे महिन्याच्या पूर्वी घेणे शक्य नसल्याचे शिक्षणविभागाकडून सांगण्यात आले. 

दिवाळीच्या सुट्टीनंतर लगेचच शाळा सुरू करण्याचा विचार असून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याची शिक्षण विभागाची तयारी असल्याची माहिती  शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 'झी २४ तास'ला दिली.