Railway News: मुसळधार पाऊस पडला तर सर्वात प्रथम रेल्वेवर परिणाम होतो. रेल्वे ट्रॅकवर साचलेल्या पाण्यामुळे ट्रेन उशिरा धावतात. त्यामुळे पावसाळ्यात ट्रेन उशिरा धावणं तसं आता प्रवाशांच्या अंगवळणी पडलं आहे. पण अनेकदा ट्रेन तासनतास एकाच ठिकाणी उभ्या असतात. ट्रेन मधेच अडकल्याने ट्रेनमधील प्रवाशांना एकतर खाली उतरुन जीव धोक्यात घालत ट्रॅकवरुन चालत जाणे, अन्यथा ट्रेनध्येच बसून राहण्याशिवाय पर्याय नसतो. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, गरोदर महिला यांची फार गैरसोय होते. पण प्रवाशांची गैरसोय पाहता रेल्वेने आता मोठा निर्णय घेतला आहे.
बुधवारी मुसळधार पावसाने मुंबई, ठाण्याला चांगलंच झोडपलं होतं. यामुळे लोकलसेवा पूर्ण खोळंबली होती. अंबरनाथ, बदलापूर येथे ट्रॅकवर पाणी साचल्याने कर्जत ते कल्याण रेल्वेसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तर दुसरीकडे सीएसएमटीवरुन कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या तब्बल 2 तास उशिरा पोहोचत होत्या. यादरम्यान, कल्याणमधील एका घटनेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
रेल्वेचा मोठा निर्णय! AC आणि स्लीपर कोचमधील झोपण्याचे नियम आणि वेळा बदलल्या
हैदराबादच्या योगिता रुमाले भिवंडीत आपल्या आई-वडिलांकडे प्रसूतीसाठी आल्या होत्या. सहा महिन्यांच्या ऋषिकाला घेऊन त्या उपचारासाठी जात होत्या. पण ट्रेन बंद पडल्याने खाली उतरुन जात असताना आजोबांच्या हातातून ऋषिका खाली पडली आणि नाल्यात वाहून गेली. कल्याणच्या पत्रीपुलाजवळ ही घटना घडली. या घटनेनंतर रेल्वेचा उपाययोजना फोल असल्याचं स्पष्ट झालं होतं.
ऋषिका वाहून गेल्यानंतर रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे पोलीस आणि प्रशासनाने लोकल 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ एका जागी थांबल्यास तिची पाहणी केली जाणार आहे. रेल्वे पोलीस आणि आरपीएफ या लोकलची पाहणी करतील. यावेळी या लोकलमध्ये अडकलेल्या रुग्ण, लहान मुलं, गरोदर महिला, वयस्कर यांना मदत पोहोचवली जाईल.
पत्रीपुलाजवळ आजोबांच्या हातातून खाली पडल्यानंतर नाल्यात पडून उल्हास नदीत वाहून गेलेल्या सहा महिन्यांच्या ऋषिकाचं शोधकार्य थांबवण्यात आलं आहे. आपत्ती दलाचे जवान, अग्निशमन दलाचे जवान हे शोधकार्य करत होते. आधारवाडी ते दिवा, मुंब्रा खाडी किनारा परिसरात चिमुकलीचा शोध घेण्यात आला. पण ती सापडली नाही.
याआधी रात्रीच्या वेळी प्रवास करताना जास्तीत जास्त नऊ तास झोपण्याची परवानगी होती. पण आता ही वेळ कमी करण्यात आली असून, फक्त आठ तास करण्यात आली आहे. याआधी प्रवाशांना एसी कोच आणि स्लीपरमधून प्रवास करताना रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत झोपण्याचा परवानगी होती. पण आता रेल्वेने या नियमात बदल केला आहे. रेल्वेच्या बदललेल्या नियमानुसार, आता रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंतच झोपू शकता. म्हणजेच झोपण्याची वेळ आता कमी करुन 8 तास करण्यात आली आहे. ज्या ट्रेन्समध्ये झोपण्याची व्यवस्था आहे, तिथेच हा नियम लागू होणार आहे.