Maharashtra Monsoon session : पावसाळी अधिवेशनच्या (Monsoon session 2023) पाचव्या दिवशी विधानसभा सभागृहात (Vidhansabha) विरोधक (Opposition) चांगलेच आक्रमक होण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन आक्रमक झालेल्या विरोधकांना गेले तीन दिवस जास्त आक्रमक होता आले नाही. दुसऱ्या दिवशीही किरीट सोमय्या कथित व्हिडीओ प्रकरणावरुन सभागृहात गदारोळ सुरु होता. त्यामुळे विरोधकांना महत्त्वाचे मुद्दे सभागृहात मांडता आले नाहीत. अशातच आता शैक्षणिक मुद्द्यांवरुन (educational issues) विरोधक आक्रमक होणार आहेत.
विद्यार्थीचे शैक्षणिक गुणवत्ता कमी होत असल्यामुळे वारंवार तक्रार होत असल्यामुळे आज सभागृह शिक्षणमंत्री दीपक केसरकर (deepak kesarkar) यांना विरोधक घेरणार असल्याचे दिसून येत आहे. शालेय विद्यार्थीना गणवेश वाटपाचे काम स्थानिक पातळीवर करण्यात यावे जेणे करून विद्यार्थी या गोष्टीचा लाभ लवकर उपलब्ध होईल अशी मागणीही विरोधकांकडून प्रामुख्याने करण्यात येणार आहे. यासोबत राज्यातील अनधिकृत शाळेचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला जाणार आहे. झी 24 तासाने याविषयी वारंवार पाठपुरावा केला होता. त्यामुळे आता या प्रश्नावरुन विरोधक आक्रमक होणार आहेत.
शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शरद पवार यांचे सरकारला पत्र
काही दिवसांपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स 2.0 म्हणजे पी.जी.आय. अहवाल प्रसिद्ध केला होत. यात महाराष्ट्राची दुसर्या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर घसरण झाल्याचे असल्याचे समोर आले होते. या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला पत्र लिहिलं होतं. व्यवस्थापनाचा दर्जा खालावणे हे शैक्षणिक परंपरेला लागलेले गालबोट असल्याचे म्हणत शरद पवारांनी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर आता विधानसभेतही या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक होणार आहेत.
राज्यातील शालेय विद्यार्थी पोषण आहार पासून वंचित राहत असल्याने यामुद्द्यावरही चर्चा केली जाणार आहे. राज्यातील शाळा बाह्य विद्यार्थांची संख्या वाढत असल्याने याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक महानगरपालिका मधील शिक्षण मंडळाच्या अधिकारी गैरव्यवहार प्रकरणी, राज्यातील शिक्षकची असलेली रिक्त पदे भरण्याबाबत, राज्यातील दिव्यांग शाळेत शिक्षक भरती प्रक्रियेत झालेल्या अनियमितेबाबत प्रश्न उपस्थित केला जाणार आहे. पालघर व सिधुदुर्ग जिल्ह्यातील एक शिक्षकी शाळा बंद होत असल्याचा मुद्दाही अधिवेशनात गाजणार आहे.
यासोबत राज्यातील नागरिकांना डॉ बाबासाहेब आंबेडकर व गुढीपाडवा निमित्त 100 रुपयांमध्ये शिधा वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला होता. मात्र हा शिधा सर्व नागरिकांपर्यत पोहोचलाच नाही. या सगळ्या संदर्भात देखील सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता आहे.