मुंबईत 'या' आजाराचा शिरकाव; काय आहेत लक्षणे आणि कशी घ्याल काळजी, अधिक वाचा

BMC confirm measles outbreak : मुंबई शहर आणि परिसरात गोवर आजाराचा फैलाव झाला आहे.  (Measles Outbreak In Mumbai) लहान मुलांमध्ये आढळणारा हा गंभीर विषाणूजन्य संसर्ग आहे.  त्यामुळे भीती पसरली आहे. या आजाराची लक्षणे काय आहेत आणि याबाबत कशी काळजी घ्यावी, याबाबत अधिक जाणून घ्या.

Updated: Nov 11, 2022, 12:44 PM IST
मुंबईत 'या' आजाराचा शिरकाव;  काय आहेत लक्षणे आणि कशी घ्याल काळजी, अधिक वाचा title=

BMC confirm measles outbreak in Mumbai : मुंबई शहर आणि परिसरात गोवर आजाराचा फैलाव झाला आहे.  (Measles Outbreak In Mumbai) लहान मुलांमध्ये आढळणारा हा गंभीर विषाणूजन्य संसर्ग आहे. मुंबईतील गोवंडीतील रफी नगरमधील 48 तासांच्या आत तीन मुलांचा संसर्गजन्य आजारामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भीती पसरली आहे. या आजाराची लक्षणे काय आहेत आणि याबाबत कशी काळजी घ्यावी, याबाबत अधिक जाणून घ्या.

मुंबईवर आणखी एक संकट; Measles या आजाराचा फैलाव

मुंबईत Measlesचा उद्रेक  होण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने 3 सदस्यीय पथकाची स्थापना केली आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत आजकाल Measlesची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. गोवर या आजाराचा उद्रेक झाल्याच्या वृत्तानंतर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शहरामध्ये प्रकरणांच्या वाढीचा मागोवा घेण्यासाठी एक उच्च-स्तरीय टीम नियुक्ती केलेय. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे उपसंचालक डॉ. अनुभव श्रीवास्तव हे केंद्रीय टीमचे प्रमुख असतील. 

या आजाराची काय आहेत लक्षणे?

गोवार हा अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. गोवर सुरक्षित आणि प्रभावी लसी उपलब्ध असूनही जगभरात अजूनही लहान मुलांचा मृत्यू होत आहे. ही चिंतेची बाब आहे. Measles हा मुलांमध्ये आढळणारा एक गंभीर विषाणूजन्य संसर्ग आहे. गोवरची लक्षणे खोकला लागणे, शिंकणे ही प्रामुख्याने सांगितली जातात. किंवा संक्रमित व्यक्तीच्या त्वचेच्या संपर्कात आल्याने देखील गोवर पसरतो.

गोवर या आजाराची मुंबईत पुष्टी झाली आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. लहान मुलांना हा जार होऊ शकतो. आणि जिवाला धोका पोहोचू शकतो. खोकणे आणि शिंक यामुळे या आजाराचा फैलाव होतो. लहान मुलांना याचा जास्त धोका असतो. त्यांच्यापासून दुसऱ्या मुलांना हा आजार जडतो. या आजारामुळे गंभीर कुपोषण, निमोनिया आणि मेंदुला ताप चढतो. शरीरावर लाल डाग दिसतात, नाक वाहत राहते. डोळे येणे ही याची लक्षणे आहेत.

कशी घ्याल लहान मुलांची काळजी?

दरम्यान, कोरोना आणि इतर संसर्गाचे आजार पसरत असताना आता मुंबईकरांवर गोवर साथीचे संकट उभे राहिले आहे. कारण गोवंडी भागात गोवर साथीच्या आजाराचा उद्रेक पाहायला मिळत आहे. यामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 48 तासात 3 मुलांचा गोवरमुळे मृत्यू झालाय. यामुळे आता मुंबई महापालिका (BMC) सतर्क झाली आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईत गोवरची आतापर्यंत 29 प्रकरणं समोर आलीत. या आजारात मुलांना ताप आणि डोळ्यातून पाणी येणे ही लक्षणं दिसतात. पालकांनी मुलांना गोवर या संसर्गजन्य आजारापासून वाचवण्यासाठी लसीकरण करावे. पुरळ उठल्यानंतर संसर्ग झालेल्यांना चार दिवस वेगळे ठेवावे. हा आजार हवेतूनही पसरतो. गोवर असलेल्या रुग्णांची काळजी घेतली पाहिजे.