सेना नेत्यांवर आरोप करणारे हाजी अराफत शेख मातोश्रीवर जाणार

शिवसेना उपनेते आणि महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख, आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. काही दिवसांपूर्वी हाजी अराफत शेख यांनी शिवसेना पक्षातल्या मंत्र्यांवर जातीयवादाचा आरोप केला होता. 

Updated: Aug 29, 2017, 11:37 AM IST
सेना नेत्यांवर आरोप करणारे हाजी अराफत शेख मातोश्रीवर जाणार title=

मुंबई : शिवसेना उपनेते आणि महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख, आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. काही दिवसांपूर्वी हाजी अराफत शेख यांनी शिवसेना पक्षातल्या मंत्र्यांवर जातीयवादाचा आरोप केला होता. 

आरोप केल्यानंतर अराफत शेख यांनी महाराष्ट्र शिव वाहतूक सेना अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचीही तयारी दर्शवली होती. त्या पार्श्वभूमीवर अराफत शेख उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. या बैठकीला एकनाथ शिंदे आणि अर्जून खोतकरही उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान काल अराफत शेख यांनी त्यांचे समर्थक आणि महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या पदाधिका-यांची, मुंबईतल्या कुर्ला या त्यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली होती. मात्र बैठक कमी आणि शक्ती प्रदर्शनच जास्त, असं एकंदर चित्र यावेळी दिसून आलं.