Pankaja Munde : मातोश्रीचं दार उघडं... पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीस यांचे मोठ वक्तव्य

ठाकरे गटाच्या नेत्यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेनेत (Shivsena) येण्याची खुली ऑफर दिली आहे. यामुळे  पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार अशी चर्चा रंगली आहे. . पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी मोठ वक्तव्य केल आहे. 

Updated: Jan 13, 2023, 09:47 PM IST
Pankaja Munde : मातोश्रीचं दार उघडं... पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीस यांचे मोठ वक्तव्य title=

Maharashtra Politics: स्वाभिमानानं केलेला एक्झिट कधीही बरा असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी खळबळ उडवून दिली होती. पंकजा मुंडे या पक्षात नाराज असून त्या भाजपमधून (BJP) बाहेर पडणार असल्याची चर्चा या वक्तव्यानंतर रंगली होती. यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेनेत (Shivsena) येण्याची खुली ऑफर दिली आहे. यामुळे  पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार अशी चर्चा रंगली आहे. . पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी मोठ वक्तव्य केल आहे. 

ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि सुनील शिंदे यांनी पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करण्याची खुली ऑफर दिली आहे. आमच्या कन्येवर भाजपात अन्याय होतोय असं चंद्रकांत खैरे म्हणाले. तर, पंकजा मुंडे यांचं ठाकरे गटात स्वागतचं असेल, असं म्हणत सुनील शिंदे यांनी त्यांना थेट शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर दिलेय. यापूर्वी देखील पंकजा मुंडे या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा रंगली होती. 

'पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार नाहीत'... असं महत्वाचं वक्तव्य केलंय देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. 'मातोश्रीचं दार उघडं, मात्र पंकजा जाणार नाहीत. भाजप हेच पंकजा मुंडेंचं घर आहे, असं  देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला आहे. 

पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज

 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना परभवाचा धक्का बसला. पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांना देखील याचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीचे आमदार तथा बंधू धनंजय मुंडे(dhananjay munde) यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचा राजकीय प्रवास खडतर बनला आहे. तेव्हापासून आतापर्यंत पंकजा मुंडे या पुन्हा भरारी घेण्यासाठी संघर्ष करत आहेत. मात्र, राज्यात पुनर्वसन झालेलं नाही. पक्षाकडून अद्याप त्यांच्यावर कोणतीही मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. यामुळे त्या नाराज आहेत. 

नाशिकमधील स्टुडंट समिट कार्यक्रमात झालेल्या मुलाखतीत त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे उघड केली होती. 'संधी मिळाली नाही तर स्वाभिमानानं केलेला एक्झिट कधीही बरा असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. मला संधी का देत नाही, याचं उत्तर संधी न देणा-यांना विचारा अस म्हणत त्यांनी आपली व्यक्त केली.  पंकजा मुडे भाजप पक्ष सोडणार की थेट राजकारणातून बाहेर पडणार? असे प्रश्न उपस्थित झाले.