Saif Ali Khan Attack : एकीकडे हल्लोखोर पोलिसांच्या ताब्यात तर दुसरीकडे सैफच्या घरात सापडली 'ती' गोष्ट

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर ज्या चाकूनं हल्ला केला त्याचा दुसरा भाग त्याच्याच घरातून जप्त केला. 

दिक्षा पाटील | Updated: Jan 19, 2025, 09:51 AM IST
Saif Ali Khan Attack : एकीकडे हल्लोखोर पोलिसांच्या ताब्यात तर दुसरीकडे सैफच्या घरात सापडली 'ती' गोष्ट title=
(Photo Credit : Social Media)

Saif Ali Khan Attack : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला ठाण्यात ताब्यात घेतलं आहे.  त्यामुळे आता या सगळ्यात जेव्हा हल्लेखोराला अटक करण्यात आली त्यानं सगळं का केलं आणि नेमकं काय झालं होतं हे सगळ्यांनाच जाणून घ्यायचं आहे. यासगळ्यात आणखी एक बातमी समोर आली आहे ती म्हणजे ज्या चाकूनं सैफवर हल्ला करण्यात आला होता, त्या चाकूचा दुसरा भाग हा त्याच्या घरातून मिळाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी विजय दासला झोन 6 चे डिसीपी नवनाथ ढवळेंची टीम आणि कासारवडवली पोलिसांनी संयुक्त कारवाईमध्ये ताब्यात घेतलं. विजय दास हा कासारवडवलीमधील मेट्रोचं बांधकाम सुरु असलेल्या कामगार वसाहतीमध्ये राहत होता. ही वसाहत ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमधील टीसीएस कॉल सेंटरजवळ आहे.

या आधी शुक्रवारी मुंबई पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं होतं. त्याचं कारण म्हणजे सैफच्या बिल्डिंगमध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या हल्लेखोरासारखा तो दिसत होता. त्या संक्षयितांचा प्रकरणाशी काही संबध नसल्याचं म्हटलं आहे. तर त्याची सुटका करण्यात आली आहे. 

54 वर्षांच्या सैफ अली खानवर 15 जानेवारी रोजी रात्री हल्ला झाला. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात असलेल्या डॉक्टरांनुसार, त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा आहे. सर्जरी दरम्यान, सैफ अली खानच्या शरिरातून चाकूचा भाग शरिरातून काढला आहे. 

मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला पकडण्यासाठी 35 टीम बनवली होती. एक सीसीटीव्ही फुटेज मिळाली होती. ज्यात एक संशयिताचा चेहरा दाखवला होता. त्यात त्यानं गमछा ओढला होता आणि त्याच्याकडे एक बॅग होती. या दरम्यान, रात्री जवळपास 2.30 वाजता इमारतीच्या पायऱ्यांवरून खाली पळताना दिसला. 

हेही वाचा : सैफला रुग्णालयात पोहचवणाऱ्या रिक्षा चालकाला भाडं किती मिळालं? 

सैफ अली खानला मुंबईच्या पॉश परिसरात वांद्रे वेस्टमध्ये 'सतगुरू शरण' या बिल्डिंगच्या 12 व्या मजल्यावर स्थित असलेल्या अपार्टमेंटमध्ये हा हल्लेखोर घुसला होता. त्यानं सैफवर चाकूनं हल्ला केला. सैफवर सर्जरी करणारे न्यूरोसर्जन डॉक्टर नितिन डांगे यांनी शुक्रवारी सांगितलं की 'आम्ही त्याच्या प्रक-तीवर लक्ष ठेवून आहोत. आम्हाला आशा आहे की लवकरात लवकर तो ठीक होईल. 2 आठवडे आराम केल्यानंतर तो पुन्हा सगळ्या कामांना लागू शकतो.'