Guardian Minister Full List 2024: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला रवाना होण्याआधी मागील अनेक आठवड्यांपासून चर्चेत असला पालकमंत्रिपदाचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. मंत्रीमंडळातील 42 मंत्र्यांपैकी 34 जणांच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडली आहे. विशेष म्हणजे मागील काही काळापासून बीडमधील प्रकरणांमुळे चर्चेत असलेल्या धनंजय मुंडेंना पालकमंत्र्यांच्या यादीत स्थान मिळालेलं नाही. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय दादा भुसे आणि भरत गोगावले यांनाही डावलण्यात आलं आहे. रायगड, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजी नगर यासारख्या ठिकाणी पालकमंत्रिपद नेमकं कोणाला मिळत याबद्दल उत्सुकता होती. अखेर यावर शनिवारी रात्री उशीरा पडदा पडला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रिपद स्वीकारलं असून बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री झाले आहेत. याशिवाय शिंदेंकडे मुंबई शहरचंही पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. शिंदेंप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवारांकडेही दोन जिल्ह्यांची पालकमंत्रिपदं सोपवण्यात आली असून यामध्ये पुणे आणि सध्या वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या बीडचा समावेश आहे.
गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
ठाणे – एकनाथ शिंदे
मुंबई शहर – एकनाथ शिंदे
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे-पाटील
वाशिम – हसन मुश्रीफ
सांगली – चंद्रकांत पाटील
नाशिक – गिरीश महाजन
पालघर – गणेश नाईक
जळगाव – गुलाबराव पाटील
यवतमाळ – संजय राठोड
मुंबई उपनगर - ॲड. आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा (सह-पालकमंत्री)
रत्नागिरी – उदय सामंत
धुळे – जयकुमार रावल
जालना – पंकजा मुंडे
नांदेड – अतुल सावे
चंद्रपूर – अशोक उईके
सातारा – शंभूराज देसाई
रायगड – आदिती तटकरे
लातूर – शिवेंद्रसिंह भोसले
नंदुरबार – माणिकराव कोकाटे
सोलापूर – जयकुमार गोरे
हिंगोली – नरहरी झिरवाळ
भंडारा – संजय सावकारे
छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
धाराशिव – प्रताप सरनाईक
बुलढाणा – मकरंद जाधव (पाटील)
सिंधुदुर्ग – नितेश राणे
अकोला – आकाश फुंडकर
गोंदिया – बाबासाहेब पाटील
कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ (सह-पालकमंत्री)
गडचिरोली - ॲड. आशिष जयस्वाल (सह-पालकमंत्री)
वर्धा – डॉ. पंकज भोयर
परभणी – मेघना बोर्डीकर