मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी बिगुल वाजले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरु आहे. ही निवडणूक शिवसेनेसाठी एकदम महत्वाची झाली आहे. ठाकरे घराण्यातील पहिला सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. मुंबईतील वरळी विधानसभा मतदार संघातून रोड शोकरत आदित्य ठाकरे गुरुवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत वडील उद्धव आणि आई सौ. रस्मी होत्या. दरम्यान, नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी सर्वप्रथम आजोबा बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी आणि घरातून बाहेर पडण्याआधी आदित्य ठाकरे यांनी आजोबा बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झालेत. याचा फोटो त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केल आहे. आदित्य ठाकरे बाळासाहेबांचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 3, 2019
महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांचा चेहरा म्हणून पुढे आणले आहे. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अनेक राजकीय व्यासपीठावरुन सांगितले की, आपण एक दिवस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेले आश्वासन नक्कीच पूर्ण करणार आणि शिवसेनेचा पुढचा मुख्यमंत्री नक्कीच एक दिवस राज्यात पुन्हा खुर्चीवर बसेल.
आदित्य ठाकरे हे निर्विवाद निवडणू यावेत यासाठी शिवसेने खास खबरदारी घेतली आहे. त्यांच्या मार्गात कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठीही शिवसेना प्रयत्नशील आहे. वरळीचा मतदारसंघ शिवसेनेसाठी सर्वात सुरक्षित मतदार संघ आहे. तशी जागा शोधली गेली. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर यांना शिवसेनेत घेत हा मतदारसंघ अधिक सुरक्षित केला. दरम्यान, गेल्या निवडणुकीत अहिर यांना शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, त्याआधी ते राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते.