औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरेंनी घेतला एमआयएमचा समाचार

अजित पवार यांच्यावर ही टीका

Updated: Oct 11, 2019, 11:14 AM IST
औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरेंनी घेतला एमआयएमचा समाचार title=

औरंगाबाद : औरंगाबादच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरेंनी एमआयएमचा चांगलाच समाचार घेतला. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पराभवाची खंत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. यावेळी त्यांनी अजित पवारांवरही जोरदार तोंडसुख घेतलं. 

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'हे संभाजी नगर की औरंगाबाद सांगा मला, हीच ओळख आहे न, मग गेल्यावेळी काय झालं. तुमच्या 7 हजार पिढ्या इथं उतरल्या तरी संभाजी नगरचा भगवा उतरणार नाही, या आगीशी जो खेळेल तो खाक होईल, लक्षात ठेवा. देशात भगवा फडकला मात्र संभाजी नगरमध्ये भगवा नाही हे दुःख आहे, गाफील राहू नका, घात होईल. आता आपला खासदार नाही, पण पुन्हा येईल. चूक झाली की तो बोकांडी बसतो, पुन्हा रझाकार आले तर आम्ही चिरडून टाकू.'

'मराठवाड्याची भूमी संतांची आहे, दहशतवाद्यांची नाही. कन्नडच्या त्या विश्वास घातकी मुळे भगवा उतरला, भगव्याशी हरामखोरी सहन करणे शक्य नाही. लोकसभा दुर्दैवाने गेली मात्र यावेळी हिरव्यांचे डिपॉझिट जप्त करू, आमच्या डोक्यावर नाचण्याचे स्वप्न पाहू नका, खुलताबादला एक गाडला आहे, पुन्हा इथेच गाडू.'

'हा हिरवा खासदार आहे, तो मराठवाडा मुक्ती संग्राम ला येत नाही, लाज वाटायला हवी. गेल्या 5 वर्षात मी सरकारवर टीका केली, मात्र सरकार पाडण्याचा कधीही प्रयत्न केला नाही.'

'स्वातंत्र्य काळातील काँग्रेसच्या नेत्यांसमोर आदराने मान खाली जायची, आता लाजेने मान खाली जाते. पवार म्हणतात हे सरकार पाडणार, आपण विघ्नसंतोषी आहेत, आम्हाला माहिती आहे, मात्र आमचं सरकार जाणार नाही तुम्ही वाट पाहत राहा'

'पुढच्या 5 वर्षात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आहोत. अजित पवार म्हणतात, आम्हालाही भावना असतात, इतरांच्या भावना कधी कळल्या का तुम्हाला? असा प्रश्न देखील उद्धव ठाकरेंनी केला.'

'समान नागरी कायदा करा, आणि हिरव्या नागांची नागपंचमी पाकिस्तानात करा. संभाजी नगरला जो हिरवा विळखा पडतोय तो काढून फेकण्याची हीच ती वेळ आहे, पुन्हा चूक करू नका, तुमचा राग मान्य आहे, तुम्ही चिडला मी चूक मान्य करतो, सुधारतो, पण राग काढताना आपण कुणाला मदत करतोय याच भान ठेवा, हा हिरवा राक्षस आपल्याला नको, त्याला गटारात फेका.' असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.