विधानसभा निवडणूक २०१९ : संपूर्ण २८८ मतदारसंघातील उमेदवारांची यादी

महाराष्ट्रातील संपूर्ण मतदारसंघातील उमेदवारांची यादी

शैलेश मुसळे | Updated: Oct 11, 2019, 10:23 AM IST
विधानसभा निवडणूक २०१९ : संपूर्ण २८८ मतदारसंघातील उमेदवारांची यादी title=

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर चार महिन्यांनी लगेचच महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. २१ ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे, तर २४ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप महाराष्ट्रात निवडणुका लढवणार आहे. लोकसभेत मिळालेलं यश हे भाजपसाठी नक्कीच फायद्याचं ठरेल. तसेच शिवसेनेसोबत युती झाल्यामुळे दोन्ही पक्षांना याचा फायदा होईल. दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने देखील एकत्र येत आघाडी केली आहे.

युती आणि आघाडी झाल्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरी पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरांचा फटका युती आणि आघाडीला बसण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रात भाजप १५० जागा, शिवसेना १२४ आणि घटक पक्ष १४ जागांवर निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ जागा लढवत असून उर्वरित ३८ जागां मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत.

पाहा संपूर्ण उमेदवारांची यादी

२८८ मतदारसंघातील उमेदवारांची यादी