मॉर्निंग वॉक करताना अचानक समोर आला वाघ अन्...

महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये वाघाच्या दहशतीने लोक भयभीत झाले असताना मॉर्निंग वॉक (Morning walk) दरम्यान एका वृद्धासमोर अचानक वाघ आला. त्यानंतर त्यांना हदयविकाराचा झटका ( heart attack) आल्याची माहिती मिळत आहे. 

Updated: Nov 11, 2022, 04:44 PM IST
मॉर्निंग वॉक करताना अचानक समोर आला वाघ अन्...  title=

Maharashtra : महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये वाघाच्या दहशतीने लोक भयभीत झाले असताना मॉर्निंग वॉक (Morning walk) दरम्यान एका वृद्धासमोर अचानक वाघ आला. त्यानंतर त्यांना हदयविकाराचा झटका ( heart attack) आल्याची माहिती मिळत आहे. मात्र सकाळी फिरताना वाघ दिसल्याने घाबरून वेगाने पायदळ येत असताना त्यांना हदयविकाराचा झटका आल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

आजकाल महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये (Chandrapur) वाघाच्या दहशतीने लोक हैराण झाले आहेत. रहिवासी परिसरात वाघ अनेकदा फिरताना दिसतो. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मॉर्निंग वॉकला (Morning walk)  असताना 65 वर्षीय वृद्धासमोर अचानक वाघ दिसला. बघता बघता त्या वृद्धाला हृदयविकाराचा झटका आला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला.  प्रवीण मराठे (praveen marathe) असे या वृद्धाचे नाव असून कारने शहराच्या बाहेरील भागात गेला आणि रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून मॉर्निंग वॉकला निघाला. फिरून परतत असताना प्रवीण यांना रस्त्याच्या कडेला वाघ दिसला. वाघाला समोर पाहून प्रवीण मराठे यांच्या हृदयाचे ठोके इतके वाढले की त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि तिथेच त्यांना प्राण गमवावे लागले.

वाचा : बेल्जियमच्या तरुणीने पंजाबच्या निहंगशी केले लग्न; फेसबुकवर मैत्री झाली अन्...     

मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या कडेला एक वृद्ध बेशुद्ध अवस्थेत होते. त्यावेळी त्यांनी 108 क्रमांकावर रुग्णवाहिकेला कळवले मात्र रुग्णवाहिका तेथे पोहोचण्यास 1 तासापेक्षा जास्त वेळ लागला.  त्यानंतर लोकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच वृद्धाचा  मृत्यू झाला होता. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, एक वाघ रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना प्रवीणला वाघाचा सामना करावा लागला आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. लोकांच्या म्हणण्यानुसार, या संकुलात अनेकदा वाघ फिरताना दिसतो. आजही काही लोकांना वाघ रस्ता ओलांडताना दिसला.