UP, MP प्रमाणे महाराष्ट्रातही लव्ह जिहाद कायदा लागू होणार; हिवाळी अधिवेशनात चर्चा

नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी विधेयक आणणार आहोत अशी माहिती भाजप आमदार व माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी दिली आहे. 

Updated: Nov 11, 2022, 04:33 PM IST
UP, MP प्रमाणे महाराष्ट्रातही लव्ह जिहाद कायदा लागू होणार; हिवाळी अधिवेशनात चर्चा  title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती​ : लव्ह जिहाद रोखण्यासाठी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात विशेष कायदा लागू करण्यात आला आहे. या पाठोपाठ आता महाराष्ट्र सरकारने  देखील लव्ह जिहाद(Law against Love Jihad) विरोधात कायदा आणण्याची तयारी सुरु केली आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा मांडला जाणार आहे. माजी मंत्री व आमदार प्रवीण पोटे(Former Minister and MLA Praveen Pote) यांनी याबाबत माहिती दिली. 

भाजप आमदार  करणार लव्ह जिहाद विरोधी कायद्याची मागणी

मागील काही दिवसांत लव्ह जिहादची प्रकरण वाढली असल्याचा आरोप केला जात आहे. लव्ह जिहाद सारख्या  प्रकारांवर आळा बसावा यासाठी कायदा आणावी अशी मागणी केली जात आहे.  नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी विधेयक आणणार आहोत अशी माहिती भाजप आमदार व माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी दिली आहे. 

लव्ह जिहाद कायद्याअंतर्गत गैरकृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाईची तरतूद

या नविन लव्ह जिहाद कायद्याअंतर्गत गैरकृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाईची तरतूद असेल. अंतरजातीय विवाहच्या नावाने एक मोठा स्कॅण्डल राज्यात चालू आहे. सध्या अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात आंतरजातीय विवाहाच्या नावाखाली एक मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे दिसून येते. 

अमरावतीच्या बहुचर्चित उमेश कोल्हे हत्याकांड प्रकारणातील एक आरोपी देखील अशा प्रकारच्या कृत्यात मध्यप्रदेशच्या इंदोर मध्ये सहभागी होता. आई वडील आपल्या मुलीला मोठं करतात आणि अचानक त्या मुलीला फूस लावून पळवून नेले जाते अशा प्रकारच्या विवाहचे नोंदणी देखील संशयस्पद असते त्यामुळे या प्रकाराला आळा बसवण्यासाठी हा कायदा आणणार असल्याची माहिती प्रवीण पोटे यांनी दिली.