न्याय मिळेना! तरुणाने पोलीस चौकीसमोरच स्वत:ला पेटवले, पुण्यात धक्कादाय प्रकार

Pune Crime: पोलिसांनी रोहिदासला मारहाण करणाऱ्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र त्यांच्यावर कारवाई केली नव्हती.

Pravin Dabholkar | Updated: Feb 13, 2024, 02:57 PM IST
न्याय मिळेना! तरुणाने पोलीस चौकीसमोरच स्वत:ला पेटवले, पुण्यात धक्कादाय प्रकार title=
Pune Crime

Pune Crime: पोलीस चौकीसमोरच तरुमाने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. न्याय मिळत नसल्याने तरुणाने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

रोहिदास अशोक जाधव असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो 28 वर्षांचा आहे. रोहिदास हा वाघोलीच्य डोमखेल रोडवरी रा. सिद्धी अपार्टमेंटमध्ये राहतो. काही कारणामुळे त्याचा सोसायटीत वाद झाला होता. या वादातून त्याला मारहाण करण्यात आली होती. याची तक्रार त्याने पोलीस स्थानकात दिली. मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होईल, अशी अपेक्षा रोहिदासला होती. पण तसे झाले नाही. 

पोलिसांनी रोहिदासला मारहाण करणाऱ्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र त्यांच्यावर कारवाई केली नाही. याचा राग रोहिदासच्या मनात होता. त्यामुळे आत्मदहनाचा निर्णय त्याने घेतला. आणि सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास  वाघोली पोलीस चौकी समोर तो पोहोचला आणि त्याने स्वतःला पेटून घेतले.

यामध्ये रोहिदास 90 टक्के भाजला आहे. त्याला वाघोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत. 

Pune News : पुण्यात पाण्याची टाकी फुटून भीषण अपघात; तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

अचानक लागला वणवा, 9 वाहने खाक 

पुण्यात घडलेल्या दुसऱ्या एका घटनेत 9 वाहने भस्म झाली आहेत.  पुण्याच्या मुळशी तालुक्यातील भांबर्डे एकोले गाव परिसरात अचानक वणवा पेटला. यामुळे लागेलल्या आगीत पर्यटकांची 9 वाहनं जळून खाक झाली आहेत. 
एकोले गावातील लोटस पॉईंट जवळ ही घटना घडलीयं. 

लोटस पॉईंटवर पर्यटक फिरायला येत असतात. येते नेहमीच पर्यंटकांची गर्दी असते. दूरवरुन आलेले पर्यटक येथे गाडी लावून फिरायला जातात. अशाच प्रकारे पर्यटक गाडी लावून गेले असताना ही घटना घडली. परिसरात असणाऱ्या सुकलेल्या गवतला अचानक आग लागली. या आगीत 7 दुचाकी आणि 2 चारचाकी वाहन जळून राख झाल्या आहेत. यावेळी घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या पर्यटकांकडून वणवा विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यात त्यांना यश आलं नाही. तोपर्यंत गाड्या पूर्णपणे जळाल्या होत्या. 

पुणेः गळ्यातील लॉकेटसाठी बिबट्याची नखे हवी होती, अल्पवयीन मुलांनी कळसच गाठला