Maharashtra New CM : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा ऐतिहासिक विजय झाल्यानंतर तब्बल 14 दिवसांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलीय. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांनी चार मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गुरुवारी (5 डिसेंबर 2024) ला मुंबईतील आझाद मैदानात महायुतीच्या या त्रिमूर्तींचा भव्यदिव्य असा शपथविधी सोहळा झालाय. या सोहळ्याला बॉलिवूडपासून खेळ जगतातील अनेक दिग्गजांनी उपस्थितीती लावली. महायुतीचा शपथविधीसाठी खास नवी दिल्लीवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितीत होते. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या त्रिमूर्तींपैकी सर्वाधिक श्रीमंत कोण आहे तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल. (maharashtra cm shapath Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde Who is the richest leaders net worth)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, फडणवीस यांच्या नावावर एकूण 13.27 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
फडणवीस यांच्या नावावर : 56.07 लाख रुपयांची संपत्ती
त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस : 6.96 कोटी रुपये
त्यांच्या मुलगी दिविजा : 10.22 लाख रुपये जंगम मालमत्ता
फडणवीस कुटुंबाची संपत्ती मुख्यतः जंगम आणि अचल स्वरूपात आहे, ज्यात त्यांच्या पत्नीची संपत्ती मोठ्या प्रमाणावर आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 2019 ते 2024 दरम्यान संपत्तीत 63.31% वाढ झाली आहे. 2019 मध्ये त्यांच्याकडे 11.56 कोटी रुपयांची संपत्ती होती, जी आता 38 कोटींचा घरात आहे.
जंगम व अचल मालमत्ता : 37.68 कोटी रुपये
2019 च्या तुलनेत मोठी वाढ
कर्ज : 5.29 कोटी रुपये
शिंदे यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत मोठी वाढ झाली असून ती महाराष्ट्रातील राजकारण्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे अजित पवार यांची संपत्ती प्रतिज्ञापत्रानुसार, पवार यांच्या नावावर 125 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
जंगम व अचल मालमत्ता: 125 कोटी रुपये
5 वर्षांत वाढ: 49 कोटी रुपये
अजित पवार यांनी आपल्या राजकीय प्रवासात संपत्ती वाढवण्याबरोबरच आर्थिक क्षेत्रातही आपली पकड मजबूत केल्याच पाहिला मिळतंय.
महाराष्ट्राचे हे त्रिमूर्ती फडणवीस, शिंदे, आणि पवार यांच्या संपत्तीची तुलना केली असता, अजित पवार हे सर्वाधिक श्रीमंत नेते आहेत. त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे आणि मग देवेंद्र फडणवीस हे श्रीमंत आहे.