बापरे! मैदानात खेळाडूंच्या अंगावर कोसळली वीज, दोन जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

नागपूर जिल्ह्यातील ही भीषण घटना असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

Updated: Sep 10, 2021, 09:54 PM IST
बापरे! मैदानात खेळाडूंच्या अंगावर कोसळली वीज, दोन जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी title=

नागपूर : नागपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील चनकापूर इथं मैदानावर खेळणाऱ्या दोन युवकांच्या अंगावर वीज कोसळली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे.

12 वर्षांचा तन्मय दहिकर आणि 22 वर्षांचा अनुज कुशवाह अशी मृत युवकांची नावं आहेत. आज संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली

चनकापूर वेकोलो वसाहत परिसरातील काही युवक चनकापूर इथल्या मैदानावर खेळण्यासाठी आले होते. संध्याकाळी 4 वाजल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. यावेळी शेडकडे धाव घेत असताना तन्मय, अनुज आणि सक्षम गोठीफोडे या तिघांवर वीज कोसळली. यात तन्मय आणि अनुजचा जागीच मृत्यू झाला. तर सक्षम जखमी झाला असून त्याला नागपूर इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.