औरंगाबाद : जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्यांवर आलाय.. त्यामुळे आज दुपारपर्यंत धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.
दारणा, पालखेड, भंडारदरा, निळवंडे, गंगापूर, ओझर ,नांदूर मधमेश्वर या धरणातून ३० हजार क्युसेक एवढं पाणी सोडण्यात आलंय. त्यामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात वाढ झालीये.
यापूर्वी 2008 मध्ये जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले होते.. त्यानंतर आज हे दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे.