Human Urine Used In Making Energy : मानवाच्या युरीन पासून कार्बन पदार्थ आणि ऊर्जा निर्मिती केली जाऊ शकते. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रोफेसर आणि संशोधक विद्यार्थ्यांनी याचा शोध लावला आहे. इलेक्ट्रिक बॅटरीमध्ये याचा वापर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. संशोधकांच्या शोधाला मेरिकेचे पेटंट मिळाले आहे.
या प्रयोगासाठी वेगवेगळ्या 40 प्राण्यांच्या युरीनची तपासणी करण्यात आली. यामध्ये माणसाच्या युरिनमध्ये सर्वाधिक प्रमाणात युरिक ऍसिड आढळून आले. शुगर पेशंट मध्ये तर युरिक ऍसिड चे प्रमाण सर्वाधिक असते. युरिक ऍसिडमुळे त्यामध्ये फोटो कॅथेलिस्ट तयार करणे सहज शक्य होते. युरिनमध्ये स्टॅबीलायझिंग एजंट टाकला तर फोटोकॅथेलिस्ट तयार होतात. त्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाऊ शकते. यापासून हायड्रोजन निर्मितीही केली जाऊ शकते. हायड्रोजन पासून ऊर्जा निर्मिती होते
इलेक्ट्रिक बॅटरी मध्ये याचा वापर करण्याचा संशोधकांचा मानस आहे. बॅटरी मध्ये हाय पॉवर नसते तर हाय एनर्जी असते. या प्रयोगातून निर्माण केलेल्या उर्जेत हाय पॉवर आणि हाय एनर्जी दोन्ही मिळणार आहे. त्यामुळे बॅटरी जास्त काळ टिकू शकते. मानवी शरीरातील कॅन्सर सेल शोधण्यासाठी याचा उपयोग होतो का यावरही संशोधन केले जात आहे
या संशोधनाचे पेटंट मिळावे यासाठी प्रोफेसर माने यांनी सौदी अरेबियातील प्रोफेसर मित्राकडून आर्थिक मदत मिळवली. अमेरिकेने या संशोधनाला पेटंट दिले आहे. भारत सरकारनेही या संशोधनाला सहकार्य करण्याची गरज आहे.
सध्या जगभरात ग्रीन एनर्जीचे पर्याय शोधले जात आहेत. यामुळे मराठवाड्यातील संशोधकांचे हे संशोधन निश्चितच श्वास्वत पर्याय ठरणार आहे.