Coldplay Concert : ...अन् क्रिस मार्टिननं हजारोंच्या गर्दीसमोर गायलं 'वंदे मातरम', 'मां तुझे सलाम'; पाहा Video

Coldplay Chris Martin Sings Vande Mataram and Maa Tujhe Salaam :  कोल्डप्लेनं त्याच्या अहमदाबादमधील कॉन्सर्टमध्ये गायली 'वंदे मातरम', 'मां तुझे सलाम' ही दोन गाणी... 

दिक्षा पाटील | Updated: Jan 27, 2025, 01:01 PM IST
Coldplay Concert : ...अन् क्रिस मार्टिननं हजारोंच्या गर्दीसमोर गायलं 'वंदे मातरम', 'मां तुझे सलाम'; पाहा Video title=
(Photo Credit : Social Media)

Coldplay Chris Martin Sings Vande Mataram and Maa Tujhe Salaam : क्रिस मार्टिन सध्या त्याचा बॅन्ड कोल्डप्लेसोबत इंडिया टूरवर आहे. त्याचा नुकताच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दिलेल्या परफॉर्मन्सनं सगळ्यांची मने जिंकली. पण त्यानं आता असं काही केलं ज्यानं त्यानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यानं प्रजासत्ताक दिनानिमित्तानं 'वंदे मातरम' आणि 'मां तुझे सलाम' ही गाणी गायली. या दरम्यान, सगळे प्रेक्षक देखील त्याच्यासोबत ही गाणी गात होते आणि संपूर्ण स्टेडियममध्ये टाळ्यांचा आवाज येत होता. 

कोल्डप्लेचा अहमदाबाद कॉन्सर्ट 25 आणि 26 जानेवारीला मोटेरामध्ये नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजन करण्यात आला होता. बॅन्डमध्ये 18 जानेवारीला मुंबईमध्ये आपल्या म्यूजिक ऑफ द स्फीयर्स इंडिया टूरची सुरुवात झाली. त्यांनी 18,19 आणि 21 जानेवारी रोजी नवी मुंबईचया डीवाय पाटील स्टेडियममध्ये परफॉर्म केलं. कॉन्सर्ट दरम्यान, कोल्डप्लेनं शाहरुख खान आणि क्रिकेटर जसप्रीत बुमराहला शुभेच्छा दिल्या आणि इतकंच नाही तर ब्रिटिशींनी केलेल्या अत्याचारासाठी भारताची माफी मागितली. क्रिस मार्टिननं हा सचिन तेंडुलकरच्या फाउंडेशनच्या पाचव्या अ‍ॅनिव्हर्सरीच्या कार्यक्रमात देखील सहभाग घेतला होता. 

26 जानेवारी रोजी हा लाइव्ह कार्यक्रमाचं टेलिकास्ट हे Disney+ Hotstar वर करण्यात आलं होतं. हा कॉन्सर्ट संध्याकाळी 7:45 वाजे पासून या प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करण्यात आला होता. 

याशिवाय या कॉन्सर्टमध्ये भारतीय क्रिकेट संघातील (Team India) गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं हजेरी लावली होती. जसप्रीत बुमराह देखील या कॉन्सर्टमध्ये आल्याचं क्रिस मार्टिनीला कळालं. हे कळताच क्रिस मार्टिनीनं त्याच्या हटके अंदाजात तिथल्या तिथे एक गाणं बनवत जसप्रीतचं कॉन्सर्टमध्ये स्वागत केलं. 

हेही वाचा : 'लेझिम खेळतानाचं दृश्य अनावधानानं आल्यास...' उदय सामंतांनी 'छावा'च्या दिग्दर्शकांचा उल्लेख करत स्पष्टच म्हटलं...

"Jasprit Bumrah, my beautiful brother," असं म्हणत त्यानं बुमराहसाठी गाणं गायलं. त्यानंतर संपूर्ण स्टेडियमममध्ये  'बुमराsssह  बुमराssssह' च्याच आवाज येऊ लागला. सगळे लोक त्याचीच चर्चा करत आहेत. त्याचे व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, कोल्डप्लेच्या कॉन्सर्टला चाहते खूप गर्दी करत आहेत. त्यांची तरुणांमधील क्रेझ ही या त्यांच्या कॉन्सर्टमधून दिसून येत आहे.