शहनाज गिलने आजवर अनेक चित्रपट आणि म्युझिक व्हिडीओंमध्ये काम केलं, पण तिच्या करिअरमध्ये एकही हिट चित्रपट नाही. तिच्या लोकप्रियतेची आणि यशाची गाथा पाहता हेच जिसते की, एक कलाकार कधी कधी फक्त त्याच्या अभिनयामुळे किंवा चित्रपटांच्या यशामुळे प्रसिद्ध होत नाही, तर त्या व्यक्तिमत्वामुळेही लोकांच्या मनात एक खास स्थान निर्माण करू शकतो.
शहनाजने आपल्या करिअरची सुरुवात 2015 मध्ये एका पंजाबी म्युझिक व्हिडीओ 'शिव दी किताब'मधून केली. त्यानंतर तिने अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केलं, जसे की 'सत श्री अकाल इंग्लंड' (2017), 'काला शाह काला' (2019) आणि 'डाका' (2020). तिच्या गाण्यांनी आणि अभिनयाने त्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळवला, पण बॉक्स ऑफिसवर ती कोणतीही उल्लेखनीय कामगिरी साधू शकली नाही.
तिचा खूप मोठं टर्निंग पॉइंट म्हणजे 'बिग बॉस 13'. या रियालिटी शोमधून शहनाज गिलने प्रचंड प्रसिद्धी मिळवली. तिचं आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं नातं प्रेक्षकांना खूप आवडलं. 'बिग बॉस 13' मध्ये तिच्या व्यक्तिमत्वाने तिला 'पंजाबची कतरिना कैफ' म्हणून ओळख मिळवली.
शहनाजने 'बिग बॉस 13' नंतर सलमान खानच्या चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' मध्ये काम केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला, पण त्यानंतर शहनाजला बॉलिवूडमध्ये एक स्थान मिळालं. तिचं व्यक्तिमत्व, आकर्षक स्टाइल आणि सोबत असलेल्या बबली अदा यामुळे तिचं नाव लवकरच प्रसिध्द होऊ लागलं. यानंतर ती भूमी पेडणेकरसोबत 'थँक्स फॉर कमिंग' या चित्रपटातही दिसली, पण तोही बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडू शकला नाही.
तिच्या प्रोफेशनल जीवनावर विचार करता शहनाजने अनेक म्युझिक व्हिडीओसाठी काम केलं आहे, ज्यात 'वादा है', 'शोना शोना', 'कुर्ता पजामा' यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे. या गाण्यांमध्ये तिच्या अभिनयाने लोकांची मनं जिंकली.
शहनाज गिल आज 33 कोटी रुपये संपत्तीची मालकीण आहे. तिचं वार्षिक उत्पन्न सुमारे 3 कोटी रुपये आहे आणि एक सोशल मीडिया पोस्टसाठी ती 10 लाख रुपये घेते. तिच्या सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत आणि ती आपल्या चाहत्यांसोबत सतत संवाद साधत राहते. शहनाजचे लोकप्रियतेचे मुख्य कारण म्हणजे तिचं स्वाभाविक आणि बबली व्यक्तिमत्व, जे तिच्या चाहत्यांना तिच्याशी जोडून ठेवतं.
शहनाज गिल आपल्या वाढदिवसाच्या खास दिवशी चाहत्यांच्या शुभेच्छांच्या वर्षावात बुडलेली दिसत आहे. तिचा भाऊ शाहबाजने सोशल मीडियावर शहनाजसाठी एक व्हिडीओ शेअर करताना 'हॅपी बर्थडे माझी बहिण' असे कॅप्शन दिलं. व्हिडीओमध्ये शहनाज दोन केक कापताना दिसते आणि तिच्या आसपास असलेले सर्वजण 'हॅपी बर्थडे' गात आहेत. शहनाज सुंदर आउटफिटमध्ये दिसते आणि तिने बेबी पिंक शाल घेतली आहे, तिचा चेहरा साध्या मेकअपमध्येदेखील खूप आकर्षक दिसत आहे.